नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतीनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ सर्वेक्षण 2023 अभियान अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. या स्वच्छ सर्वेक्षण 2023 अभियान अंतर्गत मिरा भाईंदर महानगर पालिका आयोजित प्लॉग रनचा शुभारंभ दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी ठीक 8.00 वाजता करण्यात आला.
प्लॉग रन 2022 चा शुभारंभ आयुक्त निवास येथून आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांच्या हस्ते तसेच इतर सहा ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच सदर प्लॉग रन उपक्रमास मिरा भाईंदर महानगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण ब्रँड ॲम्बेसेडर डॉ. गिरीश ओक यांची उपस्थिती लाभली.

