वर्ग 9 वीच्या विद्यार्थ्यांकडून वर्ग 10 विच्या विद्यार्थ्यांना देण्यात आला निरोप.
विनोद ठमके, विरुर स्टेशन प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन विरूर:- गुरुनानक विद्यालय विरुर येथे वर्ग 10 वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला.
10 व्या वर्गाचं शिक्षण म्हणजे आयुष्याचे टर्निंग पॉइंट असते. दहावी झाल्यानंतर विद्यार्थी अनेक क्षेत्रात जाऊन आपली आणि देशाची प्रगती करू शकतो. त्यामुळे अशा महत्वपूर्ण शैक्षणिक वर्षाचा परीक्षेचा काळ जवळ येत आहे. त्यामुळे 10 व्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी गुरुनानक विद्यालय विरुर येथे हा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.
यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले विद्यालयाचे मु. अ. श्री त्रिनगरीवर सर, प्रमुख पाहुणे विदर्भ मा.शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष ठाकरे सर, कविवर्य डॉ. किशोर कवठे सर, श्री. पिंपळकर सर आणि धानोरकर सर, मोरे सर, उराडे सर, बेले सर मोहीतकर सर, सोयाम मॅडम, ठमके मॅडम कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आणि यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा देण्यात आले
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कू. गुणगुण झाडे आणि कू. पलक हजारे यांनी केले तर प्रास्ताविक श्री. उराडे सर यांनी केले आणि आभार कू. अदिती सूनके हिने मानले. या कार्यक्रमाची सांगता विद्यार्थांना गोड देऊन करण्यात आली.

