आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या प्रयत्नांचे फलित
चेक बोरगाव येथील वीज पडून मृत्त पावलेल्या धनराज निमगडे यांच्या कुटुंबीयांना चार लक्ष रुपयाच्या धनादेशाचे वितरन आमदार मा.सुभाषभाऊ धोटे यांच्या प्रयत्नांचे फलित
राजेन्द्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी:- गोंडपिपरी तालुक्यातील चेक बोरगाव येथील श्री.धनराज निमगडे यांच्या अंगावर वीज कोसळल्याने त्यांचा ३१ जुलै रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. मृतकाच्या कुटुंबीयांची परिस्थिती हालाखीची असल्याने गावातील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते, तथा माजी उपसरपंच, तालुका काँग्रेस कमिटी अनु. जाती विभागाचे अध्यक्ष गौतम झाडे यांनी घडलेली घटना तात्काळ क्षेत्राचे आमदार सुभाषभाऊ धोटे यांचेकडे मदतीसाठी व्यता मांडली. आमदार धोटे यांनी सदर मृतकाच्या परिस्थितीच्या गांभीर्याची दखल घेऊन शासनाकडे पाठपुरावा केला व आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या प्रयत्नांतून सदर मृतकाच्या कुटुंबीयास चार लक्ष रुपयाचा धनादेश मंजूर झाला. व आज दि.१२ ऑगस्ट रोजी तहसीलदार के.डी. मेश्राम यांचे उपस्थितीत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. सविता बबलू कुडमेथे यांचे हस्ते मृतकाच्या पत्नी अलका धनराज निमगडे यांना ४ लक्ष रुपयाचा धनादेश वितरित करण्यात आला.
महाराष्ट्रसह संपूर्ण विदर्भात पावसाने कहर केला आहे. विविध ठिकाणी विजांच्या कडकडासह यावर्षी संततधार पावसाने हजेरी लावली आहे. दिनांक २९/०७/२०२२ रोजी गोंडपिपरी तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर बरसला. जिकडे तिकडे विजांचा कडकडाट. तालुक्यातील चेक बोरगाव येथील धनराज निमगडे वय ५० वर्षे हे नामक जंगल लगत शेतात चराईसाठी नेलेली गावातील गुरे राखत असताना सायंकाळच्या सुमारास त्यांच्या अंगावर वीज कोसळली व त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना प्राथमिक उपचारासाठी गोंडपिपरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर रुग्णांच्या परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता तात्काळ चंद्रपुरात हलविण्यात आले. चंद्रपुरात सुद्धा त्या रुग्णाची परिस्थिती आवाक्याबाहेर असल्यामुळे त्या रुग्णाला तात्काळ नागपूर येथील मेडिकल कॉलेज रुग्णालयात हलवून उपचार सुरू करण्यात आले. परंतु दिनांक ३१ जुलै रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मृत धनराज निमगडे सुद्ध आर्थिक परिस्थिती अत्यंत निर्धारीत होती. ‘कालाने त्यांच्या घरातील रोकर्ता गेल्याने घरावर आर्थिक संकटे प्रमुख आहेत. मृतक धनराज निमगडे यांच्या नंतर पत्नी अलका धनराज निमगडे आणि मुलगा प्रवीण धनराज निमगडे असा आप्त परिवार आहे. सदर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाखीय गावातील गावातीलच धडाडीचे सामाजिक प्रश्न गौतम झाडे यांना बघायला गेले नाहीत. त्यांनी मृत घराच्या परिस्थितीची माहिती दिली. मृतकाच्या कुटुंबीयांच्या गांभी लक्षात ठेवा परिस्थिती महिला साहेबांनी आर्थिक मदत तात्काळ पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि त्या मृतकाच्या कुटुंबीयांना चार लक्ष रुपयाची मदत स्वीकारा.
आज मृतकाच्या कुटुंबीयास तालुक्याचे तहसीलदार श्री.के.डी.मेश्राम यांचे उपस्थितीत गोंडपिपरी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. सविता बबलू कुडमेथे यांचे हस्ते चार लक्ष रुपयाचा धनादेश मृतकाच्या पत्नी अलका धनराज निमगडे यांना सुपूर्द करण्यात आला.
या दरम्यान सौ. सविता बबलू कुडमेथे नगराध्यक्षा न. पं. गोंडपिपरी, श्री. के.डी. मेश्राम तहसीलदार गोंडपिपरी, तुकाराम झाडे तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी गोडपिपरी, निलेश संगमवार कार्याध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी गोंडपिपरी, देवेंद्र बट्टे शहराध्यक्ष शहर काँग्रेस गोंडपिंपरी, गौतम झाडे अध्यक्ष अनुसूचित जमाती विभाग काँग्रेस गोडपिपरी, श्री.सुदर्शन कोवे सरपंच चेक बोरगाव, सौ.किरण झाडे पोलीस पाटील चेकबोरगाव, नीलकंठ चौधरी माजी तंटामुक्ती अध्यक्ष चेक बोरगाव, जोगेश्वर उपासे उपसरपंच चेक बोरगाव, दीपक सोयाम अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती चेकबोरगाव, सुनीलभाऊ फुकट काँग्रेस कार्यकर्ते गोंडपिपरी, करण चन्नावार, गजानन पा. झाडे, बंडू चूनारकर सचिव चेक बोरगाव, शांताराम वेलादी, विजय देवगडे, सुनील मांडवकर, संदीप सांगळे, मंगेश पेंदोर आदींची उपस्थिती होती.