प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील हिंगणघाट येथिल अ “स्कूल ऑफ लर्निंगचे केमिस्ट्रीचे” संचालक डॉ. श्याम गावंडे यांना माणगाव (रायगड) येथे स्वराज्य सह्याद्री संस्कृती तर्फे दिला जाणारा ई.स. 2023 चा छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार प्रदान करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभ मुहूर्तावर 19 फेब्रवारी ला रायगडच्या पावन भूमीत विविध क्षेत्रांमध्ये नावलौकिक मिळवलेल्या समाजसेवकांचा गौरव करणारा छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार २०२३ वितरण सोहळा दिमाखात पार पडला. या सोहळ्याला आदितीताई तटकरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या शुभहस्ते गुणवंत व्यक्तींना प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला.
समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस हा पूरस्कार प्रदान करण्यात येतो. डॉ. श्याम गावंडे यांच्या योग क्षेत्रातील अतुलनिय योगदानाची व योगाचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या व तसेच योगाचे महत्व सर्व माध्यमातुन जनमाणसात पोहोचविण्याच्या कामगिरीची दखल घेत त्यांना हा पूरस्कार देण्यात आला.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348