✒️संदिप सुरडकर नागपुर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथील कळमना पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक हृदय हेलावणाी घटना समोर आली आहे. आईने मुलीला शाळेत जाण्याच्या कारणावरून रागाविल्याने एका नववीत शिकणाऱ्या अलपवयीन विद्यार्थिनीने आपल्या राहते घरी आत्महत्या केली. ही घटना समोर येताच परिसरातील नागरिकांनी व तिचे कुटुंबिय प्रचंड धक्क्यात बसला. नंदिनी महेश लांजेवार वय 15 वर्ष असे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केलेल्या मृतक मुलीचे नाव आहे.
कळमना पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारी नंदिनी लांजेवार ही एक सर्वसाधारण कुटुंबातील मुलगी होती. 21 फेब्रुवारी ला नंदिनीच्या आईने तिला शाळेत जाण्याच्या कारणाने रागावले. तसेच परीक्षा जवळ आली असल्याने अभ्यास करण्याबाबत देखील म्हटले. यावरून नंदिनी संतापली. आणि रागाच्या भरात तिने दुपारी एक वाजताच्या सुमारास कुणाचेही लक्ष नाही हे पाहून तिने घरीच कॅनॉन नावाचे विषारी औषध प्राशन केले. त्यामुळे नंदिनीची प्रकृती बिघडली. काही वेळेतच संपूर्ण शरीरात विष पसरले.
तिने आईवडिलांना याबाबत माहिती दिल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला तातडीने नंदनवन येथील एका इस्पितळात दाखल करण्यात आले. तिच्यावर चार दिवस उपचार चालले. मात्र अखेर रविवारी रात्री 2.10. वाजताच्या सुमारास तिची जीवनयात्रा मावळली. नंदिणीच्या मृत्यूमुळे तिच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे. तिला एक लहान बहीण असून देखील तीदेखील मानसिक धक्क्यात आले. तिच्या वडिलांच्या सूचनेवरून कळमना पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348