मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन भामरागड:- जय बजरंग दल क्रिडा मंडळ, येचली द्वारा आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा इंद्रावती स्टेडियम येचली च्या भव्य मैदानावर आयोजित केले. या स्पर्धेचा उदघाटन गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या शुभहस्ते संपन्न झाले, ह्यावेळी उदघाटनिय भाषणात कोरोनामुळे आलेल्या दोन वर्षांच्या व्यत्ययानंतर पुन्हा एकदा नव्या जोशात आपल्या भागात क्रिकेट, कबड्डी, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन या सारख्या विविध स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. ग्रामीण भागातील क्रीडा क्षेत्रातील अश्या स्पर्धांच्या माध्यमातून नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन मिळून त्यांचा आत्मविश्वास उंचावतो. क्रीडासह इतर सर्व क्षेत्रात मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार, फक्त येणाऱ्या समस्या माझ्यापर्यंत पोहोचवा त्याचा समाधान मी नक्की करेन अशी ग्वाही दिली. यावेळी राजे साहेबांनी क्रिकेट खेळण्याचा आनंदही लुटला.!
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी श्रीमती शारदाताई येगोलवार माजी जिल्हा परिषद सदस्या, तर प्रमुख अतिथी म्हणून बापूजी नागपूरवार, कोषा अध्यक्ष ग्रा.पं. येचली, कमला कुसराम सरपंच ग्रा.पं. येचली, संजय येजुलवार उपसरपंच ग्रा.पं. येचली, श्रीनिवास कुंदाराम माजी उपसरपंच, सौ.सुमन तलांडी माजी उपसरपंच, कु.शारदा कोरेत सरपंच ग्रा.पं. मन्नेराजाराम, आरती बेसकर आरोग्य सेविका सह येचली गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.