अनिल अडकिने, सावनेर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर -28 फेब्रुवारी:- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावनेर येथील व्यवस्थापन समितीची नुकतीच वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली.यावेळी कार्यकाळ संपलेल्या नव्या समितीची निवड करण्यात आली.या व्यवस्थापन समितीच्या निवडीमध्ये जीटीएन इंडस्ट्रीज लिमिटेड नागपूर युनिटचे वरिष्ठ उपाध्यक्ष हेमंत मिटकर यांची चेअरमन पदावर एकमताने निवड करण्यात आली.
या सभेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रशांत नंदुरकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जीटीएन इंडस्ट्रीजचे व्यवस्थापक सुरेंद्र महंत प्रामुख्याने उपस्थित होते. येथील संस्थेची आय एम सी वर्ष 2007 पासून कार्यरत आहे.संस्थेत जवळपास 400 विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत.संस्थेत येणाऱ्या अडचणी दूर करण्याकरिता व मूलभूत सोयी सुविधा सुधारण्याकरिता या व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना हेमंत मिटकर यांनी संस्थेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले व संस्थेला नवीन उंचाईवर नेण्याकरिता समितीच्या सदस्यां सह प्रयत्नशिल राहणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रगतीसाठी व उन्नतीसाठी समितीच्या पुढील वाटचालीचा संकल्प मांडला. मिटकर यांच्या अध्यक्षपदी एकमताने झालेल्या नियुक्तीमुळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी आनंद व समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे प्राचार्य सचिव प्रशांत बाबाराव नंदुरकर यांनी आय एम सी च्या संकल्पनेबाबत माहिती दिली व विश्वास व्यक्त केला हेमंत मिटकर यांनी अध्यक्षपदाचा स्वीकार केल्यामुळे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अधिक प्रगत व अधिक उन्नती होण्यासाठी मदत होईल असा विश्वासही अनेकांनी व्यक्त केला कार्यक्रमाचे प्रास्ताविक पि.के.मानेकर यांनी केले तर आभार कुमारी नूतन अकुनवार हिने मानले.