प्रशांत जगताप मुख्यसंपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बदलापूर:- धम्मसिरी फाऊंडेशन, भारत यांच्या वतीने कुळगाव – बदलापूर नगरपरिषद सभागृह, कात्रप, बदलापूर (पूर्व) जि.ठाणे येथे 25 व 26 फेब्रुवारी 2023 रोजी राज्यस्तरीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. ह्या संमेलनाचे उद्धघाटक म्हणून डॉ. भिमराव यशवंत आंबेडकर यांची उपस्थिती होती, या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष प्रा. गौतमीपुत्र कांबळे हे होते. संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी बी. अनिल तथा अनिल भालेराव असून प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रविंद्र जाधव, राजाराम खरात उपस्थित होते.
बदलापूर येथे झालेल्या आंबेडकरी साहित्य संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक बी. अनिल तथा अनिल भालेराव यांच्या ‘कडिकाळ‘ कादंबरीचे प्रकाशन डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. यावेळी प्रा. गौतमीपुत्र कांबळे, भन्ते राहुलरत्न उपस्थित होते.
बदलापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय आंबेडकरी साहित्य संमेलनात विविध विषयावर साहित्यिक, विचारवंत, लेखक, कवी, प्रबोधनकार यांनी आपली मते स्पष्ट मांडली. यावेळी राज्यातील वेगवेगळ्या भागातून हजारो नागरिक उपस्थित होते.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

