पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
लोणीकंद पोलीस ठाणे पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- लोणीकंद पोलीस स्टेशन गु.र.नं. १००२/२०२०, भादविक ३०२, ३६४, २०१, १२० (ब), ३४ आर्म अॅक्ट ४ (२५) महा पोलीस कायदा कलम ३७ (१) १३५ मधील फरारी आरोपी नामे सचिन बाळु वारघडे याचा शोध घेणेबाबत वरिष्ठांकडुन आदेश प्राप्त झाले होते. त्याअनुशंगाने लोणीकंद पो स्टे सायबर तपास पथक प्रमुख पोलीस उप- निरीक्षक, सुरज किरण गोरे, पोलीस अंमलदार, समीर पिलाणे यांना आरोपीची माहिती देवून चाकण, आळंदी भागात रवाना केलेले होते. बातमीदारकडून प्राप्त झालेल्या माहितीप्रमाणे सदर आरोपी हा बहुळ, ता. खेड, जि.पुणे या ठिकाणी लपुन रहात असलेबाबत खात्रीशिर माहिती प्राप्त झाल्याने मा वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांचे आदेशान्वये पोलीस उप-निरीक्षक, सुरज किरण गोरे, पोलीस अंमलदार, बाळासाहेब सकाटे, समीर पिलाणे, सचिन चव्हाण, मल्हारी सपुरे असे बहुळ, ता. खेड, जि. पुणे येथे खाजगी वाहनाने जाऊन माहीतीची शहानिशा केली असता, सदर आरोपी हा बहुळ गावात अंगात केशरी रंगाचा फुल बाह्याचा शर्ट व ग्रे रंगाची फुल पँट घालून वावरत असलेचे समजले. त्यावेळी लोणीकंदी पो स्टे कडील सायबर तपास पथकाने बहुळ गावा मध्ये सापळा लावुन, आरोपी सचिन बाळु वारघडे, वय-३० वर्षे, रा. ढेरंगे वस्ती, कोरेगाव भिमा, ता. शिरुर, जि.पुणे याचा पाठलाग करून, त्यास ताब्यात घेतले आहे.
सदरची कामगिरी मा.अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग श्री. रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उप आयुक्त परीमंडळ – ०४ श्री. शशिकांत बोराटे, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, श्री. किशोर जाधव, लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गजानन पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मारुती पाटील यांचे मार्गदर्शनाखाली , पोलीस अंमलदार, बाळासाहेब सकाटे, समीर पिलाणे, सचिन चव्हाण, मल्हारी सपुरे, सागर पाटील, महिला पोलीस अंमलदार किर्ती नरवडे, कोमल भोसले, वृंदावनी चव्हाण यांनी केलेली आहे.