पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
महाराष्ट्र संदेश न्यूज! ऑनलाईन पुणे :- आज रोजी पो.हवा राजू कदम, पो हवा अमित जाधव, पो हवा आनंद पाटोळे, पो.ना सरफराज देशमुख, पो अंम. नासेर देशमुख,पो अंम. जयदेव भोसले असे पाहिजे फरारी आरोपी शोध घेत असताना पो.अंम सर्फराज देशमुख व नासेर देशमुख यांना मिळालेल्या बातमीवरून
1) हडपसर पोलिस स्टेशन*
गु.रजि नंबर 305/2023
भा.द.वि.143,145,147,149 ,324,504,34
आर्म ॲक्ट 4(25), महा. पो. अधि.37(1) सह135
क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट कलम 3,7
फिर्यादीच्या मानेवर तलवार ठेवून पुर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी देणारा, तसेच कोयत्याने गाड्यांची तोडफोड करुन डेरे कंपनी, काळेपडल परिसरात टोळीतील दहशत माजविणारा कोयता गँग चा सराईत गुन्हेगार*
2) वानवडी पोलीस स्टेशन*
गु.रजि.नं 367/21
भा द वि 380,411,34
एक वर्षापासुन पाहिजे असलेला व एकुण दोन पोलीस स्टेशनमध्ये पाहिजे अरोपी नामे*
1) पवन नारायण भारती , वय 21 वर्ष रा. तरवडे वस्ती, महंमदवाडी रोड, हडपसर पुणे.
हा वेळोवेळी गुन्हा करुन लातूर या गावी काही दिवस जात असत व वातावरण शांत झाले नंतर परत पुणे येथे येत होता त्यामुळे पोलिसांना गुंगारा देण्यात तो वेळोवेळी यशस्वी होत होता, परंतु झोन 5 च्या पथकाने बातमीदारमार्फत व तांत्रिक विश्लेषणच्या आधारे पुण्यात येताच नियोजनबद्ध सापळा रचून त्याला जेरबंद केले व आज रोजी ताब्यात घेतला..

