माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या तर्फे देण्यात आलेला प्रथम पारितोषिक पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यांतील चिंतलगुड्डा येते गोंडवाना क्रीडा मंडळ च्या वतीने टेनिस बाल क्रिडा स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले होते. सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिला पारितोषिक मँजाई जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार तर दूसरा पारितोषिक माजी जि.प.सदस्य अजय नैताम व माजी सभापती सौ.सुरेखा आलाम यांच्या कडून तर तिसरा पारितोषिक ग्रामपंचायत कमलापूर यांच्या कडून देण्यात आले आहे.सदर स्पर्धेचे एकूण ३० संघ भाग घेतला होता. आज शेवटचा दिवस अंतिम सामना चिंतलगुड्डा विरुद्ध ताटीगुड्डम यांच्यात रंगला असुन प्रथम पारितोषिक ताटीगुड्डम संघाला तर दूसरा पारितोषिक चिंतलगुड्डा संघाला मिळाला असुन अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी कमलापूरचे सरपंच श्रीनिवास पेंदाम, ग्राम पंचायत सदस्या इंदू पेंदाम, प्रतिष्ठित नागरिक विलास सिडाम, मल्लेश मारशेटी, महेंद्र पुजारी, दिवाकर आलाम, दिपक आलाम मंचावर उपस्थिति होते.
यावेळी मंडळचे अध्यक्ष कैलाश मडावी, उपअध्यक्ष तिरुपती पानेम, सचिव धीरज पेंदाम, रुपेश पेंदाम, संतोष पेंदाम, सुभाष आलाम, संतोष कसूलवार व मंडळचे सदस्यगण व गावातील महिला व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

