संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी आज महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात क्षेत्रातील हॅम अंतर्गत सुरू असलेल्या रस्त्याच्या प्रलंबित कामामुळे व ठेकेदारांकडून होणाऱ्या दिरंगाईमुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्येवर प्रश्न उपस्थित करीत क्षेत्रातील हॅम अंतर्गत सुरू असलेल्या रस्त्याची कामे नेमकी कधी पूर्ण होणार व जनतेला या खराब रस्त्यामुळे होणारा त्रास कधी थांबणार असा प्रश्न उपस्थित करून विधिमंडळाचे लक्ष क्षेत्रातील गंभीर समस्येकडे लक्ष वेधले.
आमदार सुभाष धोटे यांनी विधिमंडळामध्ये या आधी सुद्धा क्षेत्रातील या खराब रस्त्याचे संदर्भ देत नागरिकांना होणाऱ्या त्रासाचे दाखले देत रस्त्याची कामे कशी अत्यावश्यक आहेत. यामुळे विकास प्रक्रियेला कसे खिळ बसत आहे याबाबत प्रश्न उपस्थित केले होते. मात्र मागील अनेक वर्षापासून क्षेत्रात सुरू असलेले रस्त्याची कामे अनेक कारणामुळे प्रलंबित राहिले आहेत. यामुळे क्षेत्रातील वाहतूक व्यवस्था व सर्वसामान्य नागरिकांची अतिशय गैरसमज होत आहे. सर्वसामान्य नागरी यामुळे मेटाकुटीला आलेला आहे. अनेकदा या प्रश्नावरून स्थानिक नागरिकांनी रास्ता रोको यापेक्षाही जहाल आंदोलने केल्याचे संदर्भ सुद्धा त्यांनी उपस्थित केले होते. यावर संबंधित विभागाच्या मंत्र्यांनी त्यांना आस्वस्थ केले आहे की लवकरच याबाबत स्वतंत्र बैठक घेऊन हॅम अंतर्गत सुरू असलेल्या सर्व रस्त्याच्या कामांचा आढावा घेऊन या कामांना गतीने पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348