जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या हस्ते ध्वजारोहन संपन्न.
संतोष मेश्राम, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
राजुरा:- सविस्तर वृत्त खलील प्रमाणे आहे की राजुरा 13 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत दि.13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत घरोघरी तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ह्याच उपक्रमा अंतर्गत राजुरा नगरपरिषदेने तालुकास्तरावर शंभर फुटाचा ध्वज असावे असे निर्देश असताना ही प्रक्रिया लवकर पूर्ण करून चंद्रपूर जिल्ह्यात सर्वात प्रथम राजुरा शहरात 100 फूट उंचीचा राष्ट्रीय ध्वज उभारण्यात आला. आज दि.13 ऑगस्ट ला सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. हे ध्वज उभारण्यामागे नगरपरिषद राजुराचे मुख्याधिकारी तथा प्रशासक सूर्यकांत पिदूरकर यांनी अथक परिश्रम घेतले त्यांचे सुद्धा जिल्हाधिकारी यांनी कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. त्याच प्रमाणे हे ध्वज उभारन्याची संपूर्ण कारवाही करिता वारंवार पाठपुरावा करून हे काम वेळेवर पूर्ण करण्याच्या हेतूने ही प्रक्रिया पूर्ण केल्यामुळे विद्युत अभियंता आदित्य खापणे यांची सुद्धा आज जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मानपत्र व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे, तसेच कंत्राटदार यांनी खूप कमी वेळात काम पूर्ण करून दिल्याबद्दल कंत्राटदार श्री मूर्ती यांच्या सुद्धा सन्मान करण्यात आला, तसेच पुरामुळे रस्ता बंद असल्याने क्रेन उपलब्ध होत नव्हती तर श्री खलाटे सर उपविभागीय अधिकारी राजुरा यांनी माणिकगड सिमेंट कंपनीमधून क्रेन उपलब्ध करून दिली त्यामुळे स्तंभ उभा झाला आहे यात सर्वांचे श्रेय लाभले आहे. ह्या एकंदर कार्यामुळे सर्व पदाधिकारी, नागरिक तसेच नगरपरिषदेचे कर्मचारी यांना जिल्हाधिकारी यांनी शुभेच्छा दिले व तसेच आपल्या मनोगतात त्यांनी तलावातील एकोर्निया वनस्पती त्वरित नस्ट करून तलाव सुशोभित करावे असे निर्देश सुद्धा दिले. ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयकुमार जांभुळकर, प्रशासकीय अधिकारी नगरपरिषद राजुरा यांनी केले. तर उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार सूर्यकांत पिदुरकर मुख्यधिकारी तथा प्रशासक नगरपरिषद राजुरा यांनी मांनले. ह्या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख उपस्थिती उपविभागीय अधिकारी संपत खलाटे , तहसीलदार हरिष गाडे , बी.डी.ओ भिंगारदिवे, राजा पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी ,चंद्रशेखर बहादूरे, पोलीस निरीक्षक राजुरा, तसेच माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, सर्व पत्रकार व शहरातील गणमान्य नागरिक तसेच शिवाजी हायस्कूलचे एनसीसी, स्काऊट गाईड, ग्रीन आर्मी, आर एस पी चे विद्यार्थी पथक तसेच शिक्षक वृंद उपस्थित होते. या कार्यक्रमाला यशस्वी करणे करिता नगरपरिषद राजुराचे कर्मचारी विजयकुमार जांभुळकर प्रशासकीय अधिकारी, रवींद्र जामूनकर स्थापत्य अभियंता, अभिनंदन काळे रचना सहाय्यक, संकेत नंदवांशी पाणीपुरवठा अभियंता, आदित्य कापणे विद्युत अभियंता, अक्षय सूर्यवंशी मिळकत व्यवस्थापक, उपेंद्र धामणगे कर निरिक्षक, तसेच नगरपरिषदच्या सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.