Wednesday, February 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

व्यापाऱ्याला लुटमार करून २० लाख लुटणाऱ्या फरार आरोपीच्या देहूरोड पोलिसांनी आवळल्या मुस्क्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 3, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
व्यापाऱ्याला लुटमार करून २० लाख लुटणाऱ्या फरार आरोपीच्या देहूरोड पोलिसांनी आवळल्या मुस्क्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

डॅनिएल ॲन्थोनी, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पिंपरी:- एका व्यापाऱ्याला लुटमार करून त्याच्याकडील 20 लाख रुपये लुटणाऱ्या एका चोरट्याला देहू रोड पोलिसांनी नुकतीच अटक केली. आहे त्याच्या कडून एक् तलवार, आणि कोयता अशी हत्यारे पोलिसांनी जप्त केली आहेत. ही घटना दोन वर्षांपूर्वी दौंड येथे घडली होती. विशेष बाब म्हणजे हा चोरटा दोन वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत होता. ऋषिकेश उर्फ शेऱ्या राजू अडागळे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागील काही दिवसापासून देहूरोड पोलीस ठाण्याच्या परिसरात वारंवार घर फोड्या, जबरी चोरी, वाहन चोरी, सायकल चोरी अशा घटना घडत होत्या. या घटनेच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे यांच्या सूचनानुसार देहूरोड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील यांनी पोलीस स्टेशन हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासणी, जबरी चोरी, वाहन चोरी, सायकल चोरी तसेच क्राईम मॅपिंग नुसार चैन स्कॅचिंग स्पॉटवर पेट्रोलिंग करण्याचे आदेश तपास पथकाला दिले.
देहूरोड पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार हे त्या अनुषंगाने तपास करीत असताना पोलीस शिपाई सचिन शेजाळ यांना माहिती मिळाली की एक संशयित इसम साईनगर येथील पाण्याच्या टाकीच्या इथे उभा आहे आणि तो हातामध्ये तलवार घेऊन फिरत आहे. मिळालेली माहिती पोलीस शिपाई शेजाळ यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर अतिग्रे यांना कळवली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अतिग्रे यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील यांना देऊन पुढील तपास सुरू केला.

सहाय्य पोलीस निरीक्षक अतिग्रे यांनी आरोपीला पकडण्यासाठी तपास पथकातील दोन पथके तयार करून त्याना योग्य त्या सूचना देण्यात आल्या. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने तयार पथकाने साईनगर पाण्याच्या टाकीच्या परिसरात शोध सुरू केला. पोलिसांचा सुगावा लागताच तो इसम पळू लागला. पोलिसांनी पाठलाग करुन त्या इसमाला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले .पोलिसांनी नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव ऋषिकेश उर्फ शेऱ्या राजू आढागळे असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या हातात एक तलवार आणि पॅन्ट च्या आत कमरेला एक कोयता मिळून आला.
पोलिसांनी ऋषिकेश उर्फ शेऱ्या राजू आढागळे याच्याबाबत अधिक माहिती गोळा केली असता धक्कादायक माहिती समोर आली. आरोपी ऋषिकेश उर्फ शेऱ्या राजू अडागळे यांनी दोन वर्षांपूर्वी दौंड येथील एका व्यापाऱ्याचे 20 लाख रुपये लुटले असल्याचे आणि त्या दिवसापासून फरार असल्याची कबुली पोलिसांना दिली. आरोपी ऋषिकेश उर्फ शेऱ्या राजू आडागळे याच्यावर देहूरोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद झाला असून इतर पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरुद्ध दरोडा, जबरी चोरी, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न अशा प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचा पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनायक कुमार चौबे, सह आयुक्त मनोज कुमार लोहिया, अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट ,देहूरोड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर अतिग्रे, सहाय्य पोलीस निरीक्षक योगेश गायकवाड, हवालदार प्रशांत पवार, साहिल प्रकाश, पोलीस नाईक सुनील यादव, पोलीस शिपाई सचिन शेजाळ ,स्वप्नील साबळे, मोशिन अत्तार, किशोर परदेशी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Previous Post

आल्लापल्ली येथे हनुमान मंदिर बांधकामासाठी माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या कडून आर्थिक मदत.

Next Post

दक्षिण गडचिरोलीत पुन्हा एकदा नक्षलवादी सक्रिय, एटापल्ली तालुक्यात नक्षलवाद्यांकडून वाहनांची जाळपोळ.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
दक्षिण गडचिरोलीत पुन्हा एकदा नक्षलवादी सक्रिय, एटापल्ली तालुक्यात नक्षलवाद्यांकडून वाहनांची जाळपोळ.

दक्षिण गडचिरोलीत पुन्हा एकदा नक्षलवादी सक्रिय, एटापल्ली तालुक्यात नक्षलवाद्यांकडून वाहनांची जाळपोळ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In