मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली, दिं ०४ मार्च:- खासदार अशोक नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीद्वारे बेमुदत उपोषण करणाऱ्या कार्यकर्त्याच्या मागण्या संदर्भात सकारात्मकता विचार व्यक्त करत खासदार अशोक नेते यांनी बेमुदत उपोषण करणाऱ्या कार्यकर्त्याच्या मागण्या भेटीदरम्यान उपोषणाला बसणाऱ्या विज ग्राम सेवकांशी संवाद साधत त्यांच्या मागण्या ऐकून घेऊन त्यांच्या मागण्याचा विचार करून खासदार अशोकजी नेते यांनी लिंबुपाणी पाजून उपोषणाची सांगता व बेमुदत उपोषण मागे घेतले.
गडचिरोली जिल्ह्यात पेसा अंतर्गत सन २०१६-१७ पासून २०२१-२२ पर्यंत ग्राम विज सेवकांना १ दिवसाचा खंड देवुन ग्राम पंचायत परिसरात उद्भवणाऱ्या विज पुरवठ्यातील दुरुस्ती करण्यासाठी १५६ बेरोजगार युवकांना नियुक्ती देण्यात आली होती. परंतु महाराष्ट्र राज्य विज नियामक आयोगाच्या आदेशानुसार सदर कालावधी ५ वर्षाचा असल्याने सन २०२२-२३ या वर्षी महावितरण कंपनी कडून त्यांना पुनर्नियुक्ती देण्यात आली नाही. त्यामुळे १५६ यूवकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांनी गडचिरोली येथील अधिक्षक अभियंता, महावितरण कंपनी यांच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे. खासदार अशोकजी नेते यांनी या उपोषणाला बसणाऱ्या कर्त्यांची गंभीर दखल घेत राज्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री गडचिरोली जिल्हा नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी दुरध्वनीद्वारे बेमुदत उपोषणाला बसणाऱ्या ग्राम विज सेवकांच्या मागण्याचे गांभीर्य लक्षात आणुन देऊन गडचिरोली जिल्ह्याच्या पेसा अंतर्गत १५६ ग्राम विज सेवकांना पुनर्नियुक्ती देण्याची व त्यांच्या अन्य मागण्या मान्य करण्याची मागणी केली.
सदर प्रकरणी कारवाई सुरू असुन महाराष्ट्र राज्य विज नियामक आयोगाची मंजुरी मिळताच गडचिरोली जिल्ह्यातील ग्राम विज सेवकांना पुनर्नियुक्ती देण्यात येईल. त्यामुळे आंदोलन कर्त्यानी ग्राम विज सेवकांनी आपले बेमुदत उपोषण मागे घेऊन खासदार अशोकजी नेते यांनी निंबुपाणी पाजुन उपोषणाची सांगता केली.
त्यावेळी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते, प्रदेश संघटन सरचिटणीस एस.टि मोर्चाचे प्रकाशजी गेडाम,जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चाचे अविनाश पाल,विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता डोंगरवार साहेब,अतिरिक्त कार्यकारी अभियंता डि.बी.कुंमरे साहेब,तसेच उपोषणाला बसणारे अध्यक्ष, सचिव व उपोषण कार्यकर्ते उपस्थित होते.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348