पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
चंदननगर पोलीस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :–तक्रारदार- मनोज किशोर गिरचदानी, रा- रामवाडी पुणे यांनी चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीत डिगोलो सर्व्हिस स्टेशन वडगावशेरी येथून एक चंदनाचे झाड कशाचेतरी सहाय्याने कापून कोणीतरी दोन ते तिन अज्ञात इसमांनी चोरून नेले आहे अशी तक्रार दिले वरून चंदननगर पोलीस स्टेशन गु.र.नं ८७ / २०२३ भादवि कलम ३७९.३४ अन्वये गुन्हा नोंद करणेत आला होता त्या अनुषंगाने तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे तपास करत असताना दि. २३/०२/२०२३ रोजी चंदन चोरी करणारी टोळी रिवार्डीयल रोड नदी पात्रा लगत झाडा झुडपांमध्ये चंदनाचे झाड शोधत असुन त्यांचेकडे एक पांढ-या रंगाचे पोते आहेत त्यामध्ये काहीतरी असल्याची खात्रीशिर माहीती मिळाल्याने तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी जावुन खात्री केली असता तेथे वय अंदाजे २५ ते ३५ वर्षे तिन इसम उभे असल्याचे दिसले त्यांचेकडे एक पांढ-या रंगाच्या पोते दिसले त्यांना पोलीस स्टाफ असल्याची चाहुल लागताच ते तेथून पळून जावु लगले असता दोन इसम पळुन गेले व एक इसमास १९/१० वा. चे सुमारास जागीच पकडू त्यास त्याचे नाव पत्ता विचरता त्याने त्याचे नाव सद्दाम बसमिल्हा दुलोद, वय ३४ वर्षे, रा- झेडपी शाळेजवळ, जंजाळा गाव, पोस्ट अंभाई ता. सिल्लोड, औरंगाबाद असे असल्याचे सांगुन त्याचेकडे पांढ-या रंगाचे पोत्याची पाहणी केली असता त्यामध्ये दोन चंदनाचे झाडाचे खोड असल्याचे दिसल्याने खोडाबाबत बाबत त्याचेकडे विचारपुस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यास पोलीसांनी अधिक विश्वासात घेवुन त्याने सदरचे चंदनाचे खोड है डिमोलो सर्किस स्टेशन येथून काल रात्री चोरल्याची कबुली दिल्याने चंदननगर पो.स्टे गु.र.नं ८७/२०२३ भादवि कलम ३७९, ३४ अन्वये गुन्हा उघड होवुन त्यास दाखल गुन्हयात अटक करून त्याचेकडे पोलीस कस्टडीत असता अधिक तपास केला असता त्याने वानवडी पो स्टे गु.र.नं. ८४ / २०२३ भादवि कलम ३७९,३४, चतुश्रृंगी पो.स्टे गु.र.नं १०१ / २०१९ भादवि कलम ३७९, येरवडा पो. स्टे गु.र.नं ४३७ / २०२२ भादवि कलम ३७९ अन्वये गुन्हे केल्याची कबुली दिली असुन त्याचेकडुन एकुण १२,०००/- रू किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदरची कामगिरी ही मा. शशीकांत बोराटे, पोलीस उपआयुक्त सो परीमंडळ -४ पुणे शहर, मा. किशोर जाधव, सहा. पोलीस आयुक्त सो, येरवडा विभाग, पुणे शहर, मा. राजेंद्र लांडगे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सो, चंदननगर पो स्टे पुणे शहर मा जगन्नाथ जानकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सो, चंदननगर पो.स्टे. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक निलेश घोरपडे, पोउपनिरी अरविंद कुमरे, पोलीस अंमलदार सचिण रणदिवे, सुहास निगडे, अविनाश संकपाळ, महेश नाणेकर, श्रीकांत शेंडे, शिवा धांडे, नामदेव गडदरे, शेखर शिंदे, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव, विकास कदम, सुभाष आव्हाड, गणेश हांडगर यांचे पथकाने केली आहे..