निलेश पत्रकार, वणी तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वणी:- पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतं असलेल्या रासा येथील नरेश कवडू घुगुल यांच्या शेतातील गोठ्यासमोर बांधलेली एक लाख रुपये किमतीची बैलजोडी दिनांक 14 फेब्रुवारी 2023 च्या रात्री चोरून नेली आणि त्यापेक्षाही मागील पंधरा वर्षापासून बैलाच्या कष्टाने शेतातील पीक उभी राहिले असलेले जिवाभावाचे सहकारीच चोरी गेल्याने नरेंश घुगुल यांना प्रचंड धक्का बसला आहे तेव्हा बैलंजोडी चोरी गेल्याची तक्रार 15 फेब्रुवारी 2023 रोजी नरेश घुगुल यांनी वणी पोलीस ठाण्यात दिली होती
त्यावेळीं गावातील काही मित्रांनी नरेश घुगुल यांना धीर देत आणि बैलंजोडी चोरी कोणी केली याचा शोध घेतला त्यामध्ये गावातील दोघांवर संशय आला व संशयितांनी ही बैलजोडी पुढे कत्तली साठी जनावर पुरविणाऱ्यांच्या हाती दिले अशी माहिती घुगुल यांनी वणी पोलीस स्टेशन-ने नेमलेल्या भादिकर नामक तपास अधिकाऱ्याला जावून सांगितले यावरून पोलीसांनी संशयितांना पोलीस स्टेशनला पकडुन आणून सोडून दिले तेव्हां भादिकर यांना घुगुल यांनी विचारना केली असता ठोस पुरावे आणा अशा प्रकारचे उलटसुलट उत्तरे दिली व ठाण्यातून हाकलून लावल्याचे आणि तपासात हलगर्जी पणा करून तपास थातुरमाथूर करीत असल्याचे दिनांक 22 फेब्रुवारी 2023 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ पवन बन्सोड यांच्याकडे केलेल्या तक्रारीतून म्हटलें आहे तर जीवापाड जपणाऱ्या बैलाची कत्तल होण्यापूर्वी त्यांना परत आणा अशी आर्जव हाक सुध्दा केली आहे
शेतकऱ्याचे एसपीकडे साकडे: अजूनही वणी पोलिसांकडून बैलाचा शोध घेण्यात आला नाही अखेर हतबल शेतकऱ्यांने वणी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्फत तक्रारीचे निवेदन देवून त्याच्या प्रतीलीपी जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ वणी विधानसभा क्षेत्र आमदार गृहमंत्री महाराष्ट्र शासन व पालकमंत्री यवतमाळ यांना दिले आहे
तर तक्रारीतील एका आरोपीवर मुकुटबन पाटण पांढरकवडा अश्या विविध ठाण्यात विविध गुन्हे दाखल असल्याचे म्हटलें आहे तरी वणी पोलीस स्टेशनने नेमलेला भादिकर नामक तपास अधिकारी कसा काय थातुरमाथूर चौकशी करून आणि तक्रारदाराला ठाण्यातून हाकलून लावतो आणि तपासाची कामे पोलिसांची असताना कसा काय ठोस पुरावे आणा म्हणून सांगतो त्यामुळे या प्रकरणात काहीं तरी घालमेल असल्याचे चिन्हे दिसत आहे..