प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- रमाई बुद्ध विहार ,पूलई जिल्हा वर्धा येथे समता सैनिक दल वर्धा जिल्हा युनिटद्वारे गाव तिथे शाखा, घर तिथे सैनिक, विहार तिथे वाचनालय, या अभियानांतर्गत समता सैनिक दलाची ग्राम शाखा स्थापन करण्यासंदर्भात नुकतीच सभा संपन्न झाली.
यावेळी विचार मंचावर सभेचे अध्यक्ष म्हणून वर्धा जिल्हा महिला संघटीका मार्शल प्रिती आष्टेकर तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा सुरक्षा प्रमुख मार्शल आशिष पाटील, जिल्हा प्रचारक मार्शल चंदू भगत,प्रदीप कांबळे, अमोल ताकसांडे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
सदर सभेला प्रिती आष्टेकर यांनी समता सैनिक दल काळाची गरज या विषयावर संबोधित करतांना तरुणांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर निर्मित समता सैनिक दल या मात्रुसंघटनेत मोठ्या प्रमाणात सामिल होऊन संघटनेला मजबुती प्रदान करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे संचालन जिल्हा सुरक्षा प्रमुख आशिष पाटील यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रतिभा ढोके यांनी मानले.
यावेळी मीनाक्षी खोब्रागडे, शितल तागडे, प्रतीक्षा मेश्राम, अंकिता ढोके वनिता ढोके सुपीला शेंदरे, सुजाता भिमटे, चंदा पाटील, चंदा बावणे,कुणाल निकोसे, हर्षल खोब्रागडे, साहिल ढोके, आयुष खोब्रागडे, निखिल मेश्राम, संकेत ढोके,अमित बडगे, अमन मेश्राम, अनिकेत पाटील, सुशील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.