✒️संदिप सुरडकर नागपुर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. अंबाझारी पोलीस स्टेशन हद्दीत एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीने इटरनेटच्या माध्यमातून युट्यूब वर व्हिडिओ बघून स्वत:च्या घरामध्येच स्वत:ची प्रसूती केली आहे. इतकच नाही तर या मुलीने आपलं बाळ रडू नये म्हणून केलं संतापजनक कार्य. नवजात बाळ रडल्यावर ही बाब सर्वांना समजेल या भीतीमुळे मुलीने जवळ असलेल्या पट्ट्याने बाळाचा गळा आवळला आणि त्याची दुर्दैवी खून केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या अल्पवयीन मुलगी रुग्णालयात असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.
प्राप्त माहितीनुसार, दि. 3 मार्च शुक्रवारी ला नागपूर शहरातील अंबाझारी पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या एका 9 व्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचे एक वर्षा अगोदर सोशल मीडियावर ठाकूर नावाच्या तरुणाशी मैत्री झाली. या मुलीच्या घरी ती आणि तिची आई अशा दोघीच मायलेकी राहतात. आई एका खासगी कंपनीत काम करते. आई कामावर गेल्यानंतर घरी कुणी नसताना या अल्पवयीन मुलीचे तिच्या मित्राशी संबंध वाढले. तसेच ती त्याला भेटू लागली.
एक दिवस मुलीच्या घरी कोणी नसल्याचे पाहून त्या युवकाने तिला दारू पाजली. त्यामुळे ती बेशुद्ध झाली. नंतर युवकाने या मुलीवर बलात्कार केला. तिला शुद्ध आली तेव्हा आपल्याबरोबर चुकीचा प्रकार घडल्याचं तिच्या लक्षात आलं. मात्र तिने घरी या विषयी काहीच सांगितले नाही. मुलीने त्या युवकाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क झाला नाही. पुढे काही दिवसांनी ती गरोदर राहिली अस तिला समजल. पण ही बाब आईला हे समजल्यावर ती आपल्याला ओरडेल या भीतीने या अल्पवयीन मुलीने घरी आईला काहीच सांगितले नाही.
आता काय करावं या विवेचनात ती होती. मग तिने युट्यूबवर प्रसूती संबंधात व्हिडिओ पाहून सर्व माहिती मिळवण्यास सुरूवात केली. प्रसूती कशी होते? कशी केली जाते? अशी सर्व माहिती तिने मिळवली. तसेच यासाठी तिने लागणारे सामान जमा केले. शुक्रवारी दुपारी आई घरी नसताना तिच्या पोटात दुखू लागले. त्यामुळे तिने युट्यूबवर व्हिडिओ सुरू करत प्रसूती केली आणि स्वत:ची सुटका केली. मात्र यात तिने बाळाचा देखील जीव घेतला. आई घरी आल्यावर तिला मुलीची प्रकृती ठिक नसल्याचे दिसले. तसेच घरात काही ठिकाणी रक्ताचे डागही होते. त्यामुळे आईने कसून चौकशी केली असता मुलीने या बाबत घरी सर्व हकीकत सांगितली. आईने तातडीने तिला जवळच्या शासकीय रूग्णालयात दाखल केलं आहे. तिच्यावर उपचार सुरू असून. तिची प्रकृती चिंताजनक आहे.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348