युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- कळमेश्वर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार युवराज मेश्राम यांचा नुकताच वाढदिवस साजरा करण्यात आला असून त्यांनी
संकटातून मार्ग काढून राजकारण, समाजकारण, पत्रकारिता या सर्वच समाजहिताच्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे जिंदादिल व्यक्तिमत्व म्हणजे युवराज मेश्राम ! घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना सुद्धा सामाजिक जाणिवेने मागील 30 वर्षांपासून नि:स्पृहतेने राजकारण सोबत समाजकार्यासाठी सतत प्रतिबद्ध असलेला एक निरलसव कार्यकर्ता म्हणजे युवराज मेश्राम. आपल्या लेखणीने भल्या भल्यांना घाम फोडणारे, विषय कुठलाही असू द्या, सजग राहून योग्य शब्दात त्याला प्रसिद्धी देणारे व्यासंगी व्यक्तिमत्व. अनेकांना मोठेपण देऊन त्यांचे नेतृत्व फुलवून स्वतः प्रसिद्धी पासून चार हात दूर राहणारे विलक्षण व्यक्तित्व म्हणजे युवराज मेश्राम. लोककल्याणाचा ध्यास बाळगणारे शालीन व्यक्तित्व म्हणजे युवराज मेश्राम, महाराष्ट्र संदेश न्युज, स्टार महाराष्ट्र न्युज सह अनेक वृतपत्रामध्ये विविध जबाबदारी सांबाळत त्यांचा माध्यमातून अनेक समाजपयोगी कार्याला प्रसिद्धी देऊन समोरच्याचा उत्साह वाढविण्याची त्यांची कृती प्रशंसनीय.
स्वभातील नैसर्गिक गोडवा जणू तोंडात खडीसाखर घेऊनच त्यांना विधात्याने जन्माला घातले असावं. विविध विषयाचा गाढा अभ्यास. एखादा विषय डोक्यात घुसला की त्यांचेवर सखोल अभ्यास करूनच त्यावर आपले मतप्रदर्शन करण्यात त्यांचा हातखंडा. स्पष्ट आणि सडेतोड विचार हे त्यांचे वैशिष्ट्य. जे बोलेल तेच करणार, बडेजावपणा नाही. मोगऱ्याच्या फुलासारखा निखळ सुगंध देणारा देवमाणूस ! समाजहितासाठी काय काय करता येईल यासाठी सतत धावपळ आणि अशा चळवळ्या निरागस व्यक्तीच्या जन्मदिनाच्या शुभेच्छा.
पत्रकार युवराज मेश्राम यांची सामाजिक व पत्रकारिते मध्ये आवड असल्यामुळे अनेक दैनिक वृत्तपत्रामध्ये व साप्ताहिक वृत्तपत्रांमध्ये त्यांनी हिरीरीने काम केलेले आहे. सामाजिक व राजकीय संघटनेमध्ये त्यांनी चिकाटीने कार्य केले आहे. दैनिक तरुण भारत, दैनिक लोकशाही वार्ता, दैनिक नागपूर पत्रिका,फक्त पत्रकारिताच नव्हे तर, त्यांनी स्वतःचा साप्ताहिक पेपर विदर्भ पत्रिका काढला. पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार, प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर होतेच. मेश्राम यांनी अनेक सामाजिक धार्मिक राजकीय क्षेत्रात कार्य केलेले आहे. दलित ॲक्शन कमिटी, बहुजन कल्याण मंच, विदर्भ राज्य निर्माण समिती,दलित मुक्ती सेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, जनता दल, भारतीय जनता पार्टी इत्यादी अनेक सामाजिक, राजकीय पक्ष व संघटनेत उत्साह व तत्परतेने कार्य केलेले आहे म्हणून सामाजिक व राजकीय संघटनेने त्यांचा वाढदिवस साजरा केला.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष अरुण वाहने, जनकल्याण अन्याय निवारण अत्याचार समितीचे अध्यक्ष भगवानजी चांदेकर, भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष दिलीप धोटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भुजंग मोजनकर, विदर्भ राज्य पार्टीचे विधानसभा प्रमुख संजयराव चौधरी, बहुजन मुक्ती आंदोलनाचे राष्ट्रीय महासचिव कामगार नेते महेंद्रजी सातपुते, बहुजन मुक्ती आंदोलनाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश बाबू डोंगरे, भारतीय बौद्ध महासभेचे तालुका सरचिटणीस अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे वैज्ञानिक जाणीव प्रकल्प विभागाचे प्रमुख राहुल वानखेडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्रीराम भिवगडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जीवन बागडे, विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे जिल्हा कोषाध्यक्ष नामदेव ठाकरे, सावळीचे माजी सरपंच रविभाऊ चालखोर, शिवसेनेचे नेते प्रभाकरराव ठाकरे, ज्येष्ठ नागरिक डॉ. बांबल साहेब, ब्राह्मणी ग्रामपंचायतचे माजी सरपंच रामचंद्रजी चुनारकर, ब्राह्मणी ग्रामपंचायतच्या माजी सदस्या वैशाली वाहने, सामाजिक कार्यकर्त्यां सौ. वानखेडे मॅडम व सौ. चारुशीलाताई मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते वासुदेव आमझरे, लोकशाहीचे पत्रकार अनिल अडकिने, बामसेफ नेते दीपक मेश्राम, रुपेश मेश्राम, विश्वजीत मेश्राम व इतर अनेक संघटना व सामाजिक व राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348