✒️मंगेश जगताप मुंबई विक्रोळी प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- एक संतापजनक घटना समोर आली आहे. वाढदिवसानिमित्त देव दर्शन आणि नवीन कपड्यांचे आमीष दाखवून 11 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी समता नगर पोलिसांनी सावत्र पित्याला अटक केली. आरोपीने घटनेबाबत कोणालाही माहिती न देण्यासाठी पीडित मुलीला धमकावले व मारहाण केल्याचा आरोप आहे. ही घटना समोर येताच सर्वत्र एकच खळबळ माजली आहे.
तक्रारीनुसार शिर्डीतील एका हॉटेलमध्ये आरोपीने हा गैरप्रकार केला. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीनंतर समता नगर पोलिसांनी बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. तक्रारीनुसार, 11 वर्षीय पीडित मुलीचा वाढदिवस असल्यामुळे आरोपीने तिला देवदर्शनासाठी नेतो व नवीन कपडे देतो असे आमीष पत्नीला दाखवले. आरोपीने शिर्डीतील एका हॉटेलमध्ये पीडित मुलीवर अत्याचार केला. तसेच या प्रकाराची कुठेही वाच्चता करू नये अशी धमकी आरोपीने दिली. तसेच मारहाणही केली. हा प्रकार पीडित मुलीने आईला सांगितला. त्यानंतर पीडित मुलीला शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तिच्यावर उपचार करण्यात आले. समता नगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आल्यानंतर सोमवारी आरोपीला त्याला बहिणीच्या घरातून अटक करण्यात आली.