उषा कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- बौद्ध धम्म संस्कार संघ सांगली श्रावस्ती विहार सांगली तर्फे जागतिक महिलादिना निमित्य पाक कला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या निमित्ताने अनेक खाद्यपदार्थांतून महिलांच्या पाककलेचा आविष्कार सोमवारी येथे बघायला मिळाला.
8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त. बौद्ध धम्म संस्कार संघ सांगली श्रावस्ती विहार सांगली येथे आयोजित केलेल्या ‘पाक कलां” स्पर्धेत उत्साहाने सहभाग घेऊन महिलांनी अनेकविध पौष्टिक खाद्यपदार्थ तयार करून या स्पर्धेत रंग भरला. यावेळी या महिलांनी आपल्या बनवलेल्या पाक कृतीला आकर्षक सजावटही केली.
महिलांमधील पाककला कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी केवळ महिलांसाठीची ‘पाककृती स्पर्धा सोमवारी बौद्ध धम्म संस्कार संघ सांगली श्रावस्ती विहार सांगली येथे आपण खाणारे अन्न हे दर्जेदार आणि पौष्टिक असण्याच्या उद्देशाने पाककलेत कुशल असलेल्या महिलांसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
पाककौशल्य बहरले
पाककलेत महिलांची निपुणता असतेच, पण या कलेच्या माध्यमातून अनेकविध प्रयोग करताना विविध खाद्यपदार्थ तयार करण्याचा प्रयत्न काही जणी करतात. त्यांच्या अशा प्रयत्नांना प्रोत्साहन मिळावे तसेच यानिमित्ताने दर्जेदार पदार्थ निर्माण व्हावे ते खाण्यातून सुदृढता जपली जावी या हेतूने ही स्पर्धा झाली. यावेळी अनेक महिला सहभागी झाल्या.