कवियत्री: मयुरी कांबळे/टेंभरे, नागपुर
स्त्री असन सोप नव्हत पन स्त्री नसन पन कठीनच स्त्री म्हणुन जगन सोप नव्हत पन स्त्रीच मोकळ जगन कठिनच
स्त्री अस्तित्वाची जानीव असुन पन लोकांचा
डोळयातल वाईट वागणुक मात्र अनपेक्षितच
कौतुक करायला बसल की फसवेगीरीची
दुर्गंध सगळी कडे पसरलेली असेलच
स्त्री ला उंच भरारी घेवून उंच उडायच पन
विमाना इतकी आकाशात उंच उडने कठीनच
गर्भाशयात नऊ महीने ठेवन सोप मात्र बाहेरच
जग हे समजुन अंगिकार करण कठिनच
स्त्री आहे ती म्हणुन तिच वाट नेहमी कठिनच
सोबत सर्व असले तरी शेवट पर्यंत एकटीचच रान
प्रत्येक नात जपतांना केलेला त्याग मात्र अशक्यच
स्त्री म्हणुन तीच ओळख कमी वागणुक मात्र कठिनच
स्त्रीचा डोळयात स्वपन, हृदयात प्रेमाची आश
खांद्यावर जिम्मेदारी च ओझ आणि पाऊल कठीनच
अनेक रूप तिचे आणि नाव, नाते तरी अंनत
स्त्रीला समजुन तिचा जिवनाची समानता आणखी निराळीच
स्त्री असन सोप नव्हत पन स्त्री नसन पन कठिनच स्त्री म्हणुन जगन सोप नव्हत पन स्त्रीच मोकळ जगन कठिनच
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348