✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- आतंरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून नारायण सेवा मित्र परिवार हिंगणघाटचे वतीने पक्षांकरिता जलपात्राचे वितरण करण्यात आले. या निमित्ताने कापसे सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उद्योजक अशोक मिहानी होते. तसेच माजी नगराध्यक्ष पंढरीनाथ कापसे, सुनील कदम, मित्र परिवाराचे अध्यक्ष महेश अग्रवाल यांनी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते नागरिकांना जल् पात्राचे वितरण करण्यात आले.
यावेळी बोलताना अग्रवाल यांनी सदर उपक्रमाची माहिती दिली. गेल्या आठ वर्षांपासून मित्र परिवाराचे वतीने सदर उपक्रम राबविल्या जात आहे. उन्हाळ्यात सर्वत्र पाण्याचे स्त्रोत कमी होतात. त्यामुळे पक्षांची पाण्याकरिता भटकंती सुरू असते. पाण्याअभावी अनेक पक्षी तडफडून मृत्युमुखी पडतात. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपल्या घराचे छतावर जल पात्र ठेवावे, ज्यामुळे कडक उन्हाळ्यात पक्षांची तृष्णा भागविल्या जाईल. असे आवाहन केले.
यावेळी अध्यकक्षीय भाषणात मिहाणी यांनी नारायण सेवा मित्र परिवार म्हणजे सेवा भावी कार्याचा आदर्श असल्याचे सांगून विविध उपक्रमाचे कौतुक केले. प्रास्ताविक सचिव पराग मुडे तर संचालन कांचन खिवसरा यांनी केले. उपस्थितांचे आभार सुहास घिंनमिने यांनी मानले. या कार्यक्रमाला रूपचंद हेमनानी, विजय मुथ्था, सौ. कीर्ति करवा, सौ. शिल्पा कदम, प्रा किरण वैद्य
दुर्गा प्रसाद यादव , विपिन खिवसरा, श्यामसुंदर करवा, अजय यादव, मनोज सिंघवी, विजय शर्मा, राजेश कसवा, सुभाष लालवानी, महेश अग्रवाल,
निलेश भुतडा, चंद्रकांत रोहनकर, गौतम कोठारी, अशोक सिंघवी, बृजमोहन करवा, विक्की ठाकुर, सुनील कदम, प्रकाश जोशी, सुनील डांगरे, लक्ष्मीकांत धार्मिक, रमेश रानपारा, रायकवार, खड़की, जितेंद्र जुबनपुत्रा वीरश्री मुड़े, कंचन खिवसरा, किरण अग्रवाल, किरण वेदपाल, कंचन ठाकुर, भाग्यश्री सिंघवी, आशा संकलेचा, शीतल रूपारेल, शुभांगी वैद्य, नंदीनी जवादे, ज्योति धार्मिक, बबीता जोशी, जयश्री करवा, प्रतिभा सिंघवी, संध्या कासवा, कापसे, डांगरे, आदी सदस्य व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348