मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- अहेरी तालुक्यातील दामरंचा ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या भंगारामपेठा येतिल गोटुल भूमी पटांगणात परिसरातील भंगारामपेठा, दामरंचा, तोंडेर, चिंतारेव, चिठ्ठवेली, वेलगुर, माँड्रा, आसा या आठ गावातील महिला बचत गटाच्या वतीने जागतिक महिला दिन व सावित्रीबाईं फुले स्मृतीदिन आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे उदघाटन माजी पंचायत समितीचे सभापती सौ.सुरेखा आलाम यांच्या हस्ते करण्यात आले. तर अध्यक्ष म्हणून दामरंचा ग्राम पंचायतचे सरपंचा सौ.किरणताई कोडापे उपस्थित होत्या.
प्रमुख पाहूने म्हणून रेपनपलीचे सरपंचा सौ.लक्ष्मी मडावी, गोविंदगावचे सरपंचा कु. शंकरीबाई पोरतेट, पार्वतीबाई वेलादी, कविता तलांडी, श्रीलता आलाम, अनिता मडावी, ललिता तोडसाम, कु.वनश्री सिडाम, ग्रा.प.सदस्या, रेपनपली ग्राम पंचायतचे सदस्या सौ.छाया सड़मेक, प्रणाली मडावी, मासेबाई गावडे, रशीकला सड़मेक, अंगणवाडी सेविका सौ.चिनक्का सुरमवार निर्मला तलांडे, जोगि कुरसाम, काजल आलाम, निर्मला आलाम, सुनंदा आलाम, रसिका आलाम, रेखा कोडापे, मंचावर उपस्थित होत्या.
यावेळी उपस्थित प्रमुख मार्गदर्शक म्हणून अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री.भास्कर तलांडे,माजी सरपंच श्री.सांबया करपेत,सूरज सिडाम,यांनी जागतिक महिला दिनाबाबत व महिलांवरील अन्याय अत्याचार,याबाबत तसेच महिलांच्या विविध अडचणी बाबत मार्गदर्शन करण्यात केले.
कार्यक्रम यशस्वीसाठी श्री.प्रमोद कोडापे,माजी सरपंच जिलकरशाह मडावी,गंगाराम गावडे,भूजंगराव आलाम,आशिष सड़मेक,यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या संचालन व आभार प्रदर्शन पूजा तोडसाम यांनी केले.