मुंबईच्या विरारमध्ये अन्नातून विषबाधा, एकच कुटुंबातील दोघांचा मृत्यू, तिघ गंभीर.
रूपसेन उमराणी, मुंबई ब्यूरो चीफ
मुंबई: च्या विरारमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील एकाच कुटुंबातील पाच लहान मुलांना अन्नातून विषबाधा झाल्याची दुःखद घटनेने विरार हादळल आहे. यात दोन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर तिघ गंभीर आहे त्यांच्यावर महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना शनिवारी घडली आहे. पाच जणांपैकी पोलिसांनी दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर दोन लहान मुलांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होईल, अशी माहिती मांडवी पोलिसांनी दिली आहे.
प्राप्त माहितीनुसार, एकाच कुटुंबातील पाच मुलांना अन्नातून विषबाधा झाली आहे. पाचही मुलं रात्री जेवून झोपले. त्यानंतर सकाळी पाचही चिमुरड्यांना उलट्या आणि जुलाब होऊ लागले. यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पाच जणांपैकी दोन चिमुरड्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
विरार पूर्व टोकरे ग्रामपंचायत टोकरे पाडा येथे घडली आहे. विरार पूर्व येथील टोकरे ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या भोयपाडा येथे अश्फाक खान आणि रजियाबानू खान हे आपल्या पाच मुलांसह राहतात. शुक्रवारी राञी साडेनउच्या सुमारास हे सर्व कुटुंब जेवल्यानंतर झोपले. माञ शनिवारी पहाटेच्या सुमारास अचानक मुलांची तब्येत बिघडली. यातील नऊ वर्षाचा मुलगा आसिफ खान आणि आठ वर्षाची मुलगी फरीफ खान यांना पहाटे चारच्या सुमारास उलटी आणि पोटात दुखू लागल्याने विरारच्या भाताणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखलं केलं होतं. त्यानंतर दहा वर्षांची मुलगी फराना खान, चार वर्षाचा मुलगा आरीफ खान आणि तीन वर्षाचा मुलगा साहिल खान यांना तुळींजच्या पालिका रुग्णालयात दाखल केले. माञ यातील आसिफ आणि फरीफ या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या मांडवी पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
दरम्यान एकाच घरातील पाच लहान मुलांना विषबाधा झाल्याने परिसरात घबराटीचं वातावरण आहे. दोन चिमुरड्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होतं आहे. मांडवी पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. दोन मृत लहान मुलांचा शवविच्छेधन अहवाल आल्यानंतरच याबाबत अधिक माहिती समोर येईल. सध्या इतर तीन मुलांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.