अनिल अडकिने, सावनेर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर, 10 मार्च:- येथे हिंदवी स्वराज संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथी नुसार जयंती श्री.उत्तम कापसे माजी तालुकाप्रमुख शिवसेना सावनेर तथा शिवसेना सहसंपर्कप्रमुख रामटेक विभाग नागपूर ग्रामीण यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात साजरी करण्यात आली.
सावनेर येथे शिवसेना संपर्क ऑफिसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करित शिवाजी महाराजांचा नावाच्या जयघोष करीत कार्यकर्त्यांनी जयंती उत्साहात संपन्न करण्यात आली.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उत्तम कापसे माजी तालुकाप्रमुख शिवसेना सावनेर, सुभाष मछले शिवसेना सावनेर शहर प्रमुख, प्रफुलजी कापसे युवा सेना अध्यक्ष नागपूर ग्रामीण, गेदलाल कमाले, चंदूजी पुरे, सदाशिव गुरकरी, नरेंद्र राऊत, देवराव बनसोड,मनोहर जामदार, प्रमोद शिंदे, कपिल बंडे, मंगेश देव्हारे, नाना घुगल, प्रशांत कामोने, बालू साठे व गोपाल ढुंडुले इत्यादी पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348