युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ (नागपुर)
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- जिल्हातील कळमेश्वर येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तालुका कार्यकरिणी गठित करण्यात आली. या कार्यक्रमाला नागपूर येथील रामभाऊ डोंगरे राज्य कार्यकारिणी सदस्य यांचे अध्यक्षते खाली गठीत करण्यात आली. यावेळी समीतीचे उद्दिष्ट व कार्य चित्तरंजन चौरे नागपूर जिल्हा कार्याध्यक्ष यांनी विषद केले.
मीटिगच्या सुरवातीला संविधान प्रास्ताविकेचे वाचन वर्षाताई शहारे यांनी केले. नागपूर येथील रामभाऊ डोंगरे राज्य कार्यकारिणी सदस्य, देवानंद बडगे उत्तर नागपूर शाखा कार्याध्यक्ष इंजि. कमलाकर सतदेवे, ईंजि. गौतम पाटील, चंद्रशेखर मेश्राम यांनी धोरणात्मक विचार व्यक्त केले. व कळमेश्वर तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली.
यावेळी कळमेश्वर तालुका अध्यक्ष म्हणून डॉ. उपेंद्र महात्मे यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र ढवळे सरांची नियुक्ती करण्यात आली. कार्याध्यक्ष प्रबोधनकार गायक अरूणभाऊ सहारे प्रधान सचिव अरुणजी वाहणे बुवा बाजी संघर्ष विभाग कार्यवाह गंगाधरजी नागपूरे, वैज्ञानिक जानिव प्रकल्प विभाग कार्यवाह : राहुल वानखडे. वार्ता पत्र व प्रकाशन विभाग कार्यवाह : युवराज मेश्राम. सोशल मीडिया विभाग कार्यवाह : राजेश श्रीखंडे. विविध उपक्रम विभाग कार्यवाह : दिपक मेश्राम. सांस्कृतिक विभाग कार्यवाह: सचिन काळे. मानसिक आरोग्य विभाग कार्यवाह : लोकेश मस्के. युवा विवेक वाहीनी कार्यवाह : विजय नागपूरे . प्रशिक्षण विभाग कार्यवाह : प्रा. राकेश करमरकर. अशोक श्रीखंडे. कायदा विषयक सल्लागार : अॅड. हर्षल यावलकर. संगठन विभाग कार्यवाह : आकाशचंदर रामटेके या सर्व पदाधिकाऱ्यांच्या बहुमताने नियुक्त्या करण्यात आल्या यावेळी कार्यक्रमाला विज्ञानाला व निसर्गाला माननारी बरीच मंडळी उपस्थित होती.
त्यावेळी आभार प्रदर्शन मिटिंगचे मुख्य आयोजक अरूणभाऊ सहारे यांनी करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.