पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २,गुन्हे शाखा ,पुणे शहर
दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक २ हे लोणीकंद पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. १९७/२०२३ भादवि कलम ३७९ या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना दाखल गुन्ह्यातील चोरीचा टेम्पो व टेम्पो मधील हायर कंपनीचे फ्रिज व वॉशिंग मशीन निष्पन्न आरोपी नामे ज्ञानेश्वर उर्फ माऊली धर्मराज कोठावळे ,रा.बाहुला, ता. कळंब, जि. उस्मानाबाद याचे राहते घरी असल्याचे पोलीस अंमलदार अमोल सरतापे यांना गोपनीय बातमी मिळाल्याने लागलीच सदरची बातमी पथकाचे प्रमुख वपोनि सुनील पंधरकर यांना कळविले असता त्यांनी सदर बाबत कारवाई करणे कामी योग्य त्या सूचना दिल्याने लगेच स्टाफसह रवाना होऊन आरोपीच्या मूळ गावी पोहोचलो. सदर ठिकाणी आरोपीची चौकशी केली असता तो मिळून आला नाही परंतु सदर चोरीचा टेम्पो व मुद्देमाल त्याचे राहते घराजवळ मिळून आला. सदरचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेण्यात आला असून त्याचे वर्णन खालील प्रमाणे…
१) ७,००,००० /- रुपये किमतीचा एक अशोक लेलँड कंपनीचा पार्टनर ९०९मॉडेलचा टेम्पो
२) ३,८६,४५५ /- रुपये किमतीचे हायर कंपनीचे २१ फ्रिज व ५ वाशिंग मशीन असा एकूण १०,८६,४५५/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून लोणीकंद पोलीस स्टेशनच्या ताब्यात पुढील कार्यवाहीसाठी दिलेला आहे
सदरची कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे श्री.रामनाथ पोकळे सो , मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे सो, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. नारायण शिरगावकर सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पंधरकर यांचे मार्गदर्शना खाली पोलीस अंमलदार राजेश अभंगे, अमोल सरतापे,विनायक येवले यांनी केले आहे..