मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- येथील जिल्हा परिषद हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय एटापल्ली येथे स्वराज्यचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती व देशातील पहली महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतीदिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक वकील शेख सर तसेच प्रमुख अतिथी म्हणून प्रा. गणेश आत्राम, प्रमोद रामटेके, शुभाष वैरागडे, प्रविण चन्नावार, सुनील येणंगटीवार, मनोज इरले, कोसकेवाड मॅडम, श्रीरामे मॅडम, प्रतिमा करमरकर, डोंगरे मॅडम, आरती पवार, प्रांजली शेट्ये उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा या गीताने करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज बन्सोड यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा.गणेश आत्राम यांनी केले. या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात शाळेतील विद्यार्थी व कर्मचारीवर्ग उपस्थित होते.