✒️राज शिर्के, मुंबई (पवई) प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आले. दंड किंवा कारवाई चुकवण्यासाठी वाहनचालक पोलिसांना चकमा देण्याचा प्रयत्न करत असताना अपघातात एक मोटर सायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला तर मागे बसून असलेल्या तरुण गंभीर रित्या जखमी झाला आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबईतल वरळी परिसरात मोटर सायकल ने जाणाऱ्या दोन युवकांनी पोलिसांना चुकवण्याच्या नादात यूटर्न घेतल्याने बाईकवरील नियंत्रण सुटून दोन युवक पुलावरुन खाली कोसळले. यात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. अब्दुल अहद शेख वय 18 वर्ष, असं मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. 17 वर्षीय मोटर सायकल स्वार बेशुद्ध असून रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. वांद्य्रातील उड्डाणपुलावर बुधवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास हा अपघात घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ते भरधाव वेगात बाईक चालवत होते आणि दोघांनीही हेल्मेट घातले नव्हते. जेव्हा बाईकचालकाने पुलावर पोलिसांना पाहिलं, तेव्हा त्याने अचानक यू-टर्न घेतला, त्याच वेळी नियंत्रण गमावून त्यांची बाईक पुलाच्या रेलिंगवर आदळली आणि दोघेही रस्त्यावर खाली फेकले गेले. बाईकस्वाराच्या डोक्याला दुखापत झाली असून त्याच्यावर भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अल्पवयीन तरुण वैध परवाना शिवाय बाईक चालवत होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध फौजदारी तक्रार दाखल करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.