मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- संत तुकाराम महाराज उत्सव कमिटी द्वारे हिंगणघाट शहरातील एकमेव तुकाराम महाराज मंदिर येथे बीज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी इंदिरा गांधी वॉर्डातील पुरुष आणि महिलांनी सात दिवस तुकाराम गाथा पारायण केले. यावेळी भव्य दिंडी व महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते.
‘तुकाराम बीज, म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस, म्हणजेच तुकाराम यांना मानणाऱ्या साधकांच्या दृष्टीने या संतश्रेष्ठाच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. संत तुकाराम महाराज हे मानवाच्या रूपातील एक अवतारच असण्याचे उदाहरण, म्हणजेच त्यांनी सदेह वैकुंठ गमन करणे, म्हणजेच पंचमहाभूतांत विलीन झाले. (वैकुंठगमनाचे) सामर्थ्य दर्शवणारे संत तुकाराम महाराज हे एकटेच होते.
या बीज कार्यक्रमाला भक्तांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिल्या बद्दल मंदिराचे अध्यक्ष पांडुरंगजी बावणे तसेच कमिटीतील शंकर हटवार, हिरालाल अंबरे, गजानन माऊसकर, सुरकांत तिजारे, भानुदास कडू, सुरेश कानपिल्लेवार, प्रशांत वडतकर, शुभम अंबेरे ने समस्त इंदिरा गांधी वार्डच्या नागरिकांचे आभार मानले.