ईसा तडवी, जळगाव उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पाचोरा:- तालुक्यातील शिंदाड विकासो सहकारी सोसायटी ची पंचवार्षिक निवडणूक सन २०२३ ते २०२७ बिनविरोध संपन्न झाली. बिनविरोध निवडून आलेल्या विकासो संचालकाचा सत्कार सौ. वैशालीताई पाटील शिवसेना नेत्या तथा उध्दव मराठे उपजिल्हाप्रमुख पाचोरा यांच्या शुभहस्ते दि.११ मार्च शनिवार रोजी सकाळी १०.०० वाजता विकास सहकारी सोसायटी शिंदाड कार्यालय येथे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, पेढा भरवून अतिशय आनंदात उत्साहात संपन्न झाला.
सामाजिक, राजकीय मतभेद दूर व्हावेत, विकास व्हावा, एकोपा, शांतता नांदावी याकरिता गावातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील जेष्ठ मार्गदर्शक एकत्र येऊन गावातील होतकरु व गाव विकासाची सामाजिक बांधिलकी जोपासणारे उमेदवारांची निवड करण्यात आली. गावात तालुक्यात एक नवीन आदर्श निर्माण केला. याप्रसंगी गावातील आराध्य दैवत गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी सत्कार समारंभासाठी उद्घवभाऊ मराठे (उपजिल्हाप्रमुख), ॲड. अभय पाटील (मा.उपजिल्हाप्रमुख), प्रशांत जैन (सचिव), विकास बापु, आनंदा चौधरी, हरी अमृत चौधरी, अशोक पंडित लोधी, अरुण तांबे, भास्कर रामचंद्र पाटिल, विजय सदाशिव पाटिल, सुरेश अर्जुन पाटिल, शांताराम बळीराम पाटिल, धोंडू संपत पाटिल आदि उपस्थित होते.
सर्व बिनवरोध संचालक पुढील प्रमाणे.
१).हिलाल रामदास पाटील (सर्वसाधारण)
२).समाधान सिताराम पाटील (सर्वसाधारण)
३).नरेंद्र विक्रम पाटील (सर्वसाधारण)
४).प्रेमसिंग भुरा परदेशी(सर्वसाधारण)
५).अर्जुन नारायण पाटील (सर्वसाधारण)
६).भाऊसाहेब नारायण पाटील (सर्वसाधारण)
७).रमेश काशीराम पाटील (सर्वसाधारण)
८).दिलीप भाऊराव तांबे (सर्वसाधारण)
९).लताबाई धोंडु चौधरी (महिला राखीव)
१०).सुरेखा श्रिकांत पाटील (महिला राखीव)
११).संजय बळीराम पाटील (इतर मागास वर्ग)
१२).धनगर कृष्णा अर्जुन (वि.भ.ज)
१३).दत्तात्रय रामदास पाटील (अनु.जाती-जमाती)