✒️राज शिर्के, मुंबई (पवई) प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- पालकांनो खबरदार आपल्या मुलांकडे लक्ष द्या नाही तर बालपणात लागलेल्या व्यसनामुळे त्यांचे पुढील आयुष्य बर्बादींकडे जाऊ शकते. आज इंटरनेटच जग आहे. आज मोबाईल फोन प्रत्येक घरात वापरला जातो. त्यात लहान मुलांच प्रमाण ही मोठे आहे. पण या मोबाईल फोन मुळे मुलांचे आयुष्य बर्बाद तर नाही होत आहे ना याचे सर्व पालकांनी लक्षात घ्यावे.
प्राप्त माहिती नुसार दुपारी मी आणि एक मित्र कामानिमित्त एका शाळेजवळ थांबलो होतो तिथे 5 वी 6 वी ची काही मुले होती स्कूल बस चालकाने अर्धा तास अगोदर सोडल्याने ती मुले दुकानासमोर बसली होती त्यांची चर्चा सुरू होती त्यात एका मुलाने दुसऱ्या मुलाला सहज विचारले तू युट्यूबवर काय बघतो त्या 5 वी च्या मुलाने उत्तर दिलं ट्रिपल एक्स सर्च करतो. मला आणि मित्राला धक्काच बसला आणि आम्ही चर्चा केली अक्षरश: ते मुले ओपनली आमच्या सोबत बोलत होती.
प्रश्न हा आहे की पालकांनी मुलांना मोबाईल देणे योग्य आहे पण मुले मोबाईल वरती काय सर्च करतात याकडेही बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे. लहान मुलांमध्ये वाढत असलेले गुन्हेगारीचे प्रमाण, नशेचे प्रमाण, लैंगिकतेच्या समस्या या केवळ मोबाईलच्या वापरामुळे वाढले आहेत. पालकांनो मुलाला दोन-चार मार्क कमी पडले तरी चालतील पण त्यांच्या संस्काराकडे योग्य लक्ष द्या.