संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- दिनांक 12 मार्च रोजी वीर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके यांचे 190 वी जयंती आठवडी बाजार सोमनाथपूर राजुरा येथे आदिवासी महिला संघटना यांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात उपस्थित महिला सुशीलबाई टेकाम, बहिणाबाई सिडाम, सुनिताबाई कनाके, रेखाताई कनाके, मीनाताई टेकाम,रंभाबाई कुरसंगे, अनिताताई सिडाम, विमलाबाई यात्रा, यमुनाताई उईके व प्रमुख उपस्थिती माझी नगरसेवक भाऊजी भाऊ कन्नके व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद युवा जिल्हा कार्याध्यक्ष रविंद्र (आर.पी) आत्राम व रावण सेना चे तालुका अध्यक्ष आनंद भाऊ सिडाम आदिवासी समाज सेवक लक्ष्मण भाऊ कुळसंगे व शुरेश भाऊ टेकाम हे प्रामुख्याने उपस्थित होते.
पूर्वी चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात पारंपरिक गोंड साम्राज्याचे वर्चस्व होते. मात्र, एकोणिसाव्या शतकात हे साम्राज्य इंग्रजांनी काबीज केले. इंग्रजांनी येथील जनतेवर जुलूमशाही सुरू केली. सावकारशाहीच्या दहशतीत जनता वावरत होती. दुष्काळ, नापिकीमुळे कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यां कडून वसुली केली जात होती हा अन्याय स्वतःच्या डोळ्यांनी पाहताना वीर बाबुराव शेडमाके यांनी इंग्रजांच्या जुलूमशाहीविरोधात बंड पुकारले. शहीद शेडमाके यांचा जन्म 12 मार्च 1833 मध्ये मोलमपल्ली गडचिरोली) येथे झाला. त्यांचे चौथी पर्यंतचे शिक्षण रायपूर मध्यप्रदेश येथे झाले. अठराव्या वर्षापर्यंत त्यांनी सामाजिक नीतिमूल्ये, दांडपट्टा, तलवार, भालाफेक, गुल्यारअसे युद्ध प्रशिक्षण घेतले. इंग्रज सरकारने उभारलेली सावकारशाही उपटून फेकण्यासाठी आपल्या सवंगाड्यांना घेऊन 24 सप्टेंबर 1857 ला ‘जंगोम सेना’ उभी केली. जंगोम या शब्दाचा अर्थ गोंडी भाषेत क्रांती, जागृती असा होतो.
थोर क्रांतिकारी शहिद वीर बाबुराव पुलेसुर शेडमाके ज्यांनी इंग्रजांच्या जुलूमशाहीविरोधात सशस्त्र उठाव केला. इंग्रजांच्या सेनेला त्यांनी जंगजंग पछाडले. त्यांच्या या शौर्याची दहशत सातासमुद्रापार महाराणी व्हिक्टोरियापर्यंत गेली. शेडमाके यांना जिवंत किंवा मुर्दा पकडण्याचे फर्मान काढण्यात आले. मात्र, शहिद बाबूराव शेडमाके यांनी इंग्रजांसमोर गुढगे टेकले नाही. फौजफाटा घेऊन आलेल्या अनेक इंग्रजांचा त्यांनी खात्मा केला. मात्र, अखेर जवळच्याच लोकांनी फितुरी केली आणि इंग्रजांनी त्यांना कैद केले. शहीद बाबुराव शेडमाके वीरमरण पत्करत फासावर गेले, मात्र, या महान क्रांतिकारकाची ओळख इतिहासाच्या पानांत अमर झाली.