ईसा तडवी, जळगाव उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पाचोरा:- विभाग अंतर्गत पाचोरा, भड़गाव व पारोळा तालुक्यातील विज कर्मचारी व अधिकारी यांची आढावा बैठक आशीर्वाद हॉल पाचोरा येथे संपन्न झाली. महावितरणची नाजुक आर्थिक परिस्थिति, आर्थिक वर्ष अखेर व वाढलेली थकबाकी या पार्श्वभूमि वर सदर बैठकीस उपस्थित विज कर्मचारी अधिकारी यांना मुख्य अभियंता यानी आदेश दिले की ज्या घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, पाणीपूरवठा या विज ग्राहकांचे बिल थकीत असेल तर त्यांचा विज कनेक्शन त्वरित खंडित करा. शासनाने सवलत देवुनही आणि महावितरण ने अनेक वेळा मुदत देवुनही पाच पाच वर्षे पासून शेती पंपचे विज बिल भरलेले नाही अशा शेती पंप विज ग्राहकांचे ही विज कनेक्शन खंडित करने, कायम विज पुरवठा खंडित केलेले विज ग्राहक यांचे ही स्थळ परीक्षण करुन सदर ठिकाणी विजेचा वापर चालू असल्यास त्यांच्या वर्ती भा.द.वि. कलम १३५, १३८ प्रमाणे पोलिस कार्यवाही करण्याच्या सूचना ही त्यानी केल्या.
तसेच शासकीय कार्यलय यांच्या कडील ही विजेची थकबाकी वसूल करण्या बाबत सूचित केले. कोणीही कोणत्याही दडपण खाली न येता आप-आपल्या जबाबदारी ने कामे पूर्ण करा. मार्च महिना आहे.कोणीही वसुली च्या कामात दिरंगाई करू नये.कोणी दिरंगाई करत असल्याचे आढळून आल्यास कंपनी च्या नियमाप्रमाणे संबंधित वर्ती कठोर कार्यवाहीस सामोरे जाण्याची तयारी ठेवा मग ते महावितरण कंपनी चे अधिकारी असो वा कर्मचारी कारवाई अटळ आहे अशी तंबीच जळगाव झोन चे मुख्य अभियंता कैलास हुमणे साहेब यांनी दिले आहेत. पाचोरा विभागातील एकुन २९ कक्षप्रमुख व त्या ठिकाणी कार्यरत साधारणत: ३०० विज कर्मचारी यांची समक्ष आढावा घेऊन सूचना केल्या.सदर बैठकीस जळगाव चे अधीक्षक अभियंता राजेंद्र मार्के, पाचोरा विभागाचे कार्यकारी अभियंता रामचंद्र चव्हाण तसेच पाचोरा विभागातील अति.कार्यकारी अभियंता, उप कार्यकारी अभियंता, सर्व कक्ष प्रमुख, बिलिंगचे कर्मचारी सर्व विज कर्मचारी व बाह्यश्रोत कर्मचारी उपस्थित होते. सदर बैठक आशीर्वाद हॉल भडगाव रोड पाचोरा येथे संपन्न झाली.