✒️मंगेश जगताप मुंबई विक्रोळी प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुबई:- कुर्ला पश्चिम येथे २१ वर्षीय चुलतभावाच्या सततच्या अत्याचाराला कंटाळून १४ वर्षीय बहिणीने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता. ११) घडली. याप्रकरणी पोलिसांनी पॉक्सो कायद्यासह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून भावाला रविवारी (ता. १२) रात्री अटक केली आहे. मागील अनेक महिन्यांपासून भाऊ या मुलीवर अत्याचार करत होता. त्यामुळे पीडित बहीण मानसिक तणावात होती. यापूर्वीही तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता; मात्र तो अयशस्वी ठरला होता.
या घटनेप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अपमृत्यूची नोंद केली होती. तपासादरम्यान पोलिसांना पीडितेने लिहिलेली चिठ्ठी सापडली. त्यात पीडितेने २१ वर्षीय भावाने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याबाबत माहिती दिली होती. त्यावरून भावाच्या त्रासाला कंटाळून पीडितेने आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे पोलिसांनी स्वतः याप्रकरणी तक्रार दाखल करून गुन्ह्याची नोंद केली.

