डॅनियल अंथोनी, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पिंपरी:- फळ विक्रेत्याकडून दररोज ५० रुपयांचा हप्ता गोळा करणाऱ्या खंडणी बहादराच्या पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने मुश्क्या आवळल्या आहेत. हा प्रकार गेल्या वर्षभरापासून चिखली येथे सुरू होता. विक्रेत्यांनी खंडणी विरोधी पथकाच्या कार्यालयात समक्ष हजर राहून तक्रार दिली आहे. या तक्रारीची तत्काळ दखल घेत कारवाई करून संबंधित खंडणी खोरांना अटक करण्यात आली आहे.
बाळू उर्फ जयंत नारायण गारुळे वय -४६ वर्ष रा. राजे शिवाजीनगर सेक्टर नंबर १६,चिखली पुणे, संदीप बाबुराव पवार वय २८ वर्ष रा.मोरे वस्ती चिखली पुणे भारत नवनाथ सोनवणे वय २२,वर्षे रा. भीमशक्ती नगर मोरे वस्ती चिखली अशी अटक केल्या खंडणी बहादरांची नावे आहेत. आरोपी बाळू गारुळे हा सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध खून , खुनासह ,दरोडा, जबरी चोरी, बेकायदेशीर पिस्तूल बाळगणे, चोरी असे एकूण ०९ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. सन २०००मध्ये त्याच्यावर मोका संघटित गुन्हेगारी अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे (संघटित गुन्हेगारी) अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चिखलीतील भाजी मंडई साने चौक येथील फळ विक्रेत्याकडून काही गुंड प्रवृत्तीचे लोक दररोज ५० रुपये हप्ता गोळा करीत होते. हा प्रकार गेले वर्षभरापासून सुरू होता. या त्रासाला कंटाळलेल्या विक्रेत्यांनी थेट वाकड येथील खंडणी विरोधी पथकाचे कार्यालय गाठले .वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांना सर्व हकिकत सांगितली. बाळा गरुळ नावाचे गुन्हेगार हा मयूर ,संदीप ,भारत आणि इतर ०३साथीदार यांच्या सह विक्रेत्यांना त्रास देत आहे .हप्ता दिला नाही तर जीवे मारण्याची धमकी देतात .हा हप्ता म्हणून गल्ल्यात हात घालून २००रुपये काढून घेतले. आतापर्यंत २१हजार रुपये जबरदस्ती हप्ता म्हणून काढून घेतलेले आहे. फळ विक्रेत्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी त्वरित वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक उद्धव खाडे यानांच्या आरोपींना पकडण्याचे सूचना केल्या.आरोपीचा शोध घेतला असता ते चिखलातील भाजी मंडई मध्ये असलेल्याची माहिती मिळाली.
पोलीस पथकाने भाजी मंडईतून या खंडणी खोराना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारपूस केले असता त्यांनी गुन्हा केला असल्या ची पोलिसांना तोंडी कबुली दिली आहे. चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे ,सहआयुक्त मनोज कुमार लोहिया, अप्पर पोलीस आयुक्त डॉ.संजय शिंदे ,पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहाय्य पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शना खाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहाय्य पोलीस निरीक्षक उद्धव खाडे ,अशोध बुधवणे, अमर राऊत, पोलिस अंमलदार रमेश गायकवाड, सुनील कानगुडे, निशांत काळे, रमेश मावसकर, किरण काटकर, प्रदीप गोडांबे, विजय नलगे, ज्ञानेश्वर कुराडे, आशिष बोटके, गणेश गिरीगोसावी, शैलेश मगर, सुधीर डोळस ,प्रदीप गायकवाड, प्रदीप गुट्टे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.