आशिष अंबादे, प्रतिनिधी
हिंगणघाट :- देशात 75 वा स्वातंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने हिंगणघाट येथील महात्मा ज्योतिबा फुले वार्ड येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत मेश्राम मित्र परिवार तर्फे ७५ व्या स्वातंत्र्यदिना निमित्ताने शहरातील महात्मा फुले (चौक) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, पृथ्वीराज मेश्राम, अमोल बोरकर, राजू मुडे यांच्या उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांना बुक, पेन्सिल व मिठाई वाटून 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस साजरा केला.
या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रफुल मेश्राम, सुजाता जांभुळकर, अमित रंगारी, दिपाली रंगारी, प्रवीण जनबंधू, यश म्हैसकर, कुणाल लोणारे, अमित मुळे, अक्रम शेख, ताहिल शेख, शुभम वावरे, चेतन लोणारे, साहिल लोणारे, बंटी रामटेके, मंगेश सातघरे, वैभव चाकोले, प्रशिक रामटेके, सुमित बागेश्वर,यांनी केले.