राजेन्द्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177
चंद्रपूर:- वामनपल्ली-झरण-कन्हाळगाव, झरण-कन्हाळगाव- तोहगाव अतिवृष्टीमुळे या मार्गातील गांवांचा संपर्क तूटला.व त्याचा दुष्परिणाम सामान्य जनतेला भोगाव लागत आहे.मच्छरांचा प्रादूर्भावामूळे रोंगांची लागण होत आहे.तसेच गंभीर बीमार असलेले रूग्ण वेळेवर उपचार घेण्यासाठी शहरात पोहचू शकत नाही. गर्भवती स्त्री संकटकाळात जिल्हा ग्रामीण रुग्णालयात पोहचू शकत नाहीत. अश्या अनेक संकटांचा सामना जनतेला भोगाव लागत आहे.
सामान्य जनतेवर ओढणारे संकट जाणून त्यातून मार्ग म्हणून पूलाची मागणी ना.सूधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेला आढावा बैठकीत माजी जि.प.सदस्य अमर बोड्लावार यांनी मांडून शासनाचे लक्ष वेधले. त्या अनुषंगाने नामदार सुधिरभाऊंनी अधिकार्यांना संबधित प्रस्ताव तयार करण्याचे आदेश व सूचना केले.