तिरुपती नाल्लला, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाई राजूरा:- तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा पंचाळा येथे आयोजित सत्कार कार्यक्रमास उपस्थित होते. या जिल्हास्तरीय नवरत्न स्पर्धेत स्वयंस्फूर्त भाषण प्रकारात प्रथम क्रमांक पटकाविल्या बद्दल शाळेची विद्यार्थिनी कु. सुनेंशी विनोद भोंगळे हिच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
मुलगी शिकली प्रगती झाली हे उगीचच म्हणत नाही. आज पंचाळा सारख्या ग्रामीण भागातील कु. सुनेंशी हिने आपल्या बुद्धीच्या जोरावर स्वयंस्फूर्त भाषण स्पर्धेत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकाविला. हे खरोखरीच कौतुकास्पद आहे. तिच्या या यशासाठी तिच्यासह तिच्या मार्गदर्शक शिक्षकांचे व पालकांचे प्रथमतः अभिनंदन करतो.
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये खऱ्या अर्थाने मुलांमधील कलागुणांना वाव देऊन सृजनशील शिक्षण हसत खेळत देण्यावर भर दिला जातो. खरेतर मला सांगायला आवडेल, मी चंद्रपूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना मिशन नवचेतनाच्या माध्यमातून जिल्हाभर नवरत्न स्पर्धा घेण्यास सुरवात झाली. शालेय विद्यार्थ्यांच्या क्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी वाढिव निधीची मला तरतूद करता आली. यासोबतच ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून मागील काळात जिल्ह्यातील शाळा डिजिटल करणे, जि. प. शाळांचे संगणकीकरण, शालेय विद्यार्थ्यांना ताडोबा भ्रमंती इ. अशा अनेक शैक्षणिक उपक्रमांची मालीका जिल्ह्यात राबविण्यात आली. या वर्षीही राज्य शासनाने अर्थसंकल्पातून लेक लाडकी ही नाविन्यपूर्ण योजना मांडून आपल्या मुलींच्या भविष्याचा मार्ग सुकर केला आहे. महिलांना एसटीत सरसकट ५०% सुट, शेतकऱ्यांच्या व निराधारांच्या मानधनात वाढ, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आनंदाचा शिधा असे अनेकानेक सामान्यांच्या हिताचे निर्णय आपल्या सरकारने घेतले आहेत. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करताना पंचाळा या गावातही विकासात्मक कामे करण्यास आम्ही प्रयत्नशील आहोत. असे प्रतिपादन याप्रसंगी बोलतांना केले.
यावेळी माजी आमदार सुदर्शन निमकर, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, तालुकाध्यक्ष सुनिल उरकुडे, जिल्हा उपाध्यक्ष सतिश घोटे, वाघुजी गेडाम, जिल्हा कार्य. सदस्य अरुण मस्की, माजी सरपंच भाऊराव चंदनखेडे, सरपंच भाऊराव बोबडे, सुरेश रागीट, महादेव तपासे, सौ. यशोदाताई निरंजणे, किशोर वडस्कर, राकेश मेश्राम, श्री. मुसळे, सौ. सिमाताई भोंगळे, विनोद भोंगळे यांचेसह ग्रामस्थ बंधूभगिनीची मोठी उपस्थिती होती.