Tuesday, April 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

वर्धा: मांत्रिकाने घरातून काढला सोन्याने भरलेला हंडा, पण पुढं घडलं खळबळजनक

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 19, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ
0 0
0
वर्धा: मांत्रिकाने घरातून काढला सोन्याने भरलेला हंडा, पण पुढं घडलं खळबळजनक
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्ध्या:- जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील वाढोना गावातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेची घरातील सोनं शोधून देण्याच्या बहाण्याने त्या महिलेची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहे. घरात सोन्याचा हंडा आहे आणि आम्ही तो शोधून देतो असे आमिष दाखवून 50 हजार रूपयांची या महिलेची फसवणूक करण्यात आली आहे.

तुमच्या घरात सोन्याचा हांडा आहे, तो काढण्या साठी पैसे लागतील. सोन्याचा हिरा देखील आहे, असे आमिष दाखवून महिलेकडून 50 हजार रुपये उकळले. महिलेने पैसे दिल्यानंतर तिच्या घरातून हंडा देखील काढून दिला. परंतु, सापडलेल्या हंड्यात पॉलिश केलेले दगड निघाल्याचे समोर आले आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने परिसरातील नागरिकांच्या मदतीने दोन्ही भामट्यांना पकडून ठेवत पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली.  आसाराम नंदू वाघ आणि रोशन पिसाराम गुजर ( रा. परसोळी ता. कळमेश्वर जि. नागपूर ) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. यातील आणखी दोन आरोपी फरार असल्याची माहिती आर्वी पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाढोणा येथील इंदिरा गुलाब राऊत या महिलेच्या घरी 9 मार्च रोजी हातात मोरपीस असलेला झाडू घेऊन दोन व्यक्ती आले. त्यातील एकाने दहा रुपये मागितले. इंदिरा यांनी दहा रुपये दिले असता एकाने डोक्यावर झाडू मारुन तुमच्या घरात सोन्याचा हांडा आहे, तो काढण्यासाठी सहा हजार रुपये लागतील असे सांगितले. इंदिरा यांनी सहा हजार रुपये उसने घेऊन त्या व्यक्तीला दिले. दोघांनीही पैसे घेतले आणि तेथून निघून गेले. 11 मार्च रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास दोघेही पुन्हा महिलेच्या घरी आले आणि घरातील पोर्च जवळ खड्डा करुन जमिनीतून हंडा काढला. दोघांनी पुन्हा महिलेकडून 13 हजार रुपये घेतले. त्यानंतर दोघांनी तुमच्या घरात यापेक्षाही मोठा ऐवज आहे,  एक मोठा हिरा आहे तो नंतर काढून देतो, असे म्हणत पैसे घेऊन निघून गेले. दुसऱ्या दिवशी फोन करुन माझ्या मित्राला 21 हजार रुपये देऊन त्याच्याकडून औषध घेऊन या असे भामट्याने सांगितले. महिलेच्या मुलाने सकाळच्या सुमारास आर्वी बसस्थानकावर जाऊन एका व्यक्तीला 21 हजार रुपये देत औषध घरी आणले. दोन्ही आरोपी पुन्हा घरी आले. इंदिरा राऊत यांच्या मुलाने औषध त्यांना दिले. त्यांनी पुन्हा जमिनीतून हांडा काढून त्या खड्ड्यात औषध टाकले आणि या खड्ड्यात मोठा हिरा आहे असे म्हणत तो खड्डा बुजवून पुन्हा दहा हजार रुपये घेऊन निघून गेले. पुन्हा 12 मार्च रोजी महिलेच्या मुलाने सोनं शोधणाऱ्या भामट्याला फोन केला. तेव्हा त्याने हिरा काढण्यासाठी 9 लाख 10 हजार रुपये द्यावे लागेल असे सांगितले. त्यावेळी राऊत यांना संशय आल्याने त्यांनी जमिनीतून काढलेला हांडा उघडून पाहिला असता त्यात सोन्याचे पॉलिश केलेले दगडं आणि मूर्ती होती. हे पाहिल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. 

Previous Post

राजुरा तालुक्यातील पंचाळा येथे कु. सुनेंशी विनोद भोंगळे यांच्या सत्कार समारंभ संपन्न.

Next Post

महाराष्ट्र राज्यात केंद्राच्या अल्पसंख्याक शिष्यवृत्तीत कोट्यवधींचा घोटाळा, राज्यात एकच खळबळ.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
महाराष्ट्र राज्यात केंद्राच्या अल्पसंख्याक शिष्यवृत्तीत कोट्यवधींचा घोटाळा, राज्यात एकच खळबळ.

महाराष्ट्र राज्यात केंद्राच्या अल्पसंख्याक शिष्यवृत्तीत कोट्यवधींचा घोटाळा, राज्यात एकच खळबळ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In