डॅनियल अँथोनी, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पिंपरी:- तु प्लॉटिंगचा व्यवसाय मध्ये भरपूर पैसा कमविला आहे .माझ्यावर मर्डरची केस असून मी पिंपरी चिंचवडचा भाई आहे .तुला जर प्लॉटिंगचा धंदा करायचा असल्यास दर महिना मला १० हजार रुपये हप्ता द्यावा लागेल अशी धमकी देऊन जमीन खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकाकडे हप्ता मागणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने बेडया ठोकल्या आहेत. सुधीर सोपान जाधव वय ४२ वर्ष रा. मोईगाव, फलके वस्ती,साई लॉन्ड्री जवळ चाकण ता.खेड जि. पुणे असे अटक केलेल्या पोलीस रेकॉर्ड वरील गुन्हेगारांचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध खून, बलात्कार व इतर असे एकूण ०५ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी ता. १७ रोजी एका जमीन खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकाने पिंपरी चिंचवड खंडणी विरोधी पथकाच्या कार्यालायात येऊन तक्रार दिली होती की सुधीर जाधव नावाचा एक गुंड त्यांना गेली एक वर्षापासून त्रास देत आहे .दर महिना १०हजाराचा हप्ता मागत आहे. सुधीर जाधव यांनी गुगल पे द्वारे ३८हजार रुपये घेतले आहेत .तसेच ऑफिसमध्ये येऊन टेबलच्या ड्रॉवर मधून ४० हजाराची रोख रक्कम देखील जबरदस्तीने काढून घेतली आहे .याशिवाय पोलिसा तक्रार केल्यास तुला खल्लास करून टाकू ,आणखी ०२ लाखाची खंडणीची मागणी केली आहे .ती न दिल्यास तुझा आणि तुझ्या मुलाचा मर्डर करून टाकीन अशी धमकी दिली.
खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी तात्काळ तक्रारदाराच्या तक्रारीची दखल घेत वरिष्ठांना ही माहिती कळवली. वरिष्ठांच्या सूचनाप्रमाणे देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने आरोपी जाधव याला शुक्रवार रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मोई येथून ताब्यात घेतले चौकशी अंतर्गत त्यांना गुन्हा केला असल्याची तोंडी कबुली दिली. पुढील कारवाई करता देहू रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालाच्या कार्यक्षेत्रात छोटे-मोठे व्यवसायिक कंपनी तसेच जनतेकडून कोणत्याही प्रकारे जबरदस्ती करून हप्ता वसूल करून खंडणी गोळा करणाऱ्या इसमा बाबत माहिती निर्भीडपणे देण्याकरिता पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात पोलीस स्टेशन व खंडणी विरोधी पथकातर्फे दर्शनी भागात फ्लेक्स लावून नागरिकांनी निर्भीडपणे तक्रार द्यावी .
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह अपर पोलीस आयुक्त डॉ.संजय शिंदे, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस डाॅ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीआणि विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहाय्य पोलीस निरीक्षक उद्धव खाडे, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक अशोक दुधावणे, अमर राऊत, पोलीस अंमलदार रमेश गायकवाड, निशांत काळे, रमेश मावसकर, किरण काटकर, आशिष बोडके, शैलेश मगर, सुधीर डोळस प्रदीप गायकवाड प्रदीप कट्टे यांच्या बद्दल काही कारवाई केली आहे.