राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पोडसा:- गोंडपिपरी तालुक्यातील तेलंगाना सीमेवर वसलेल्या पोडसा येथे दिनांक १९ मार्च २०२३ ला आठवडी बैल बाजाराचा शुभारंभ मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. यावेळी उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून तालुका पंचायत समितीचे अधिकारी, गावातील सरपंच व सदस्यां सह परिसरातील सरपंच उपस्थित होते.
या कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी उत्स्फूर्ततेने बचत गटाच्या महिला, गावातील महिला व नागरिकांनी या बैल बाजार उद्घाटन सोहळ्या दरम्यान उपस्थिती दर्शवून सहभाग नोंदविला. व बैल बाजाराचा उद्घाटन सोहळा थाटामाटाने उत्साहात पार पडला. पहिल्याच दिवशी आठवडी बैल बाजाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसले. या दरम्यान आठवडी बैल बाजाराच्या एकूण उत्पन्नातून गावातील महिला ग्राम सेवा संघांला २५% रक्कम विनापरतीने देणार असल्याचा निर्णय पोडसा ग्रामपंचायतने घेणार असल्याचे सरपंच देविदास सातपुते यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे.
आजतागायत विविध महिला बचत गटांना व ग्राम संघांला विविध उपक्रमांसाठी व व्यवसायांसाठी बँकांच्या व अभियानाच्या माध्यमातून व्याजाने व अनुदानित रक्कम दिल्या जात आहे. परंतु गावातील आठवडी बैल बाजाराच्या उत्पन्नातून गावातील ग्राम संघाला देत असलेली २५% रक्कम ही कायमस्वरूपी विनापरतीने दिल्या जाणार. असा निर्णय पोडसा ग्रामपंचायतने घेतला आहे. असे सोशल मीडियाच्या माध्यमातून सरपंच देवीदास सातपुते यांनी सांगितले. या निर्णयाने गावातील महिला ग्रामसेवा संघ आनंदी असून चंद्रपूर जिल्ह्यातील पोडसा ही एकमेव ग्राम पंचायत आहे. ज्यांनी हा गावातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी उत्तम मदतीचा निर्णय घेण्यात यशस्वी झालेली आहे.

