पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- “हाच साकिब मेहबुब चौधरी ऊर्फ लतिफ बागवान रा. लुनिया बिल्डिंग, चौथा मजला, कदमचाल, कुमावत गल्ली नं. ०५, संतोषनगर, कात्रज, पुणे (टोळी प्रमुख) व त्याचे इतर १२ साथीदारांसोबत संघटित टोळी तयार करुन त्यांनी फिर्यादी हे रिक्षा प्रवासी वाहतुक करणेकरीता थांबले असता, आहे तो हाच आहे तो” असे म्हणुन फिर्यादी यांचे पाठीमागे पळुन त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व लोखंडी धारदार हत्याराने डोक्यात दोन्ही हाताच्या मनगटावर, पाठीवर वार करुन मला गंभीर जखमी करुन जिवे ठार मारण्याच प्रयत्न केला तसेच फिर्यादी यांचा मित्र नामे प्रथमेश धनाजी घाडगे रा. संतोषनगर कात्रज पुणे यास देखील संतोषनगर कात्रज पुणे येथे मारहाण करून गंभीर जखमी केले म्हणुन भारती विद्यापीठ पोलीस ठाणे येथे गु. रजि. नं. ११९ / २०२३.भा.द.वि. कलम ३०७, ३२३. १४३. १४४, १४७, १४८, १४९, महा. पो. अधि. कलम ३७(१) (३) १३५ सह भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपासा दरम्यान यातील आरोपी नामे १) रेहान सिमा शेख ऊर्फ रेहान दिनेश शेख वय १९ वर्ष रा. खोपडेनगर, व्यंकोजी खोपडे यांचे ऑफीस शेजारी, वास्तु श्री अपार्टमेंट, ६ वा मजला फलॅट नं. ६०४. कात्रज, पुणे २) अब्दुलअली जमालउददीन सय्यद वय १९ वर्ष रा. लेन नं. ७ देसाई कारखाना मागे संतोषनगर, कात्रज, पुणे ३) संकेत किशोर चव्हाण वय १८ वर्ष रा. गल्ली नं.19 प्रभा टायर्सजवळ, संतोषनगर, कात्रज, पुणे ४) ऋतिक चंद्रकांत काची वय २१ वर्ष रा. फ्लॅट नं. २०३ हर्षवर्धन अपार्टमेंट, प्रभात टायर्सजवळ, संतोषनगर, कात्रज, पुणे (विधीसंर्घषीत बालक) यातील (टोळी सदस्य) ०१ ते ०४ यांना अटक करण्यात आली असून ते सद्या येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे आहेत. (टोळी सदस्य) अ.नं. ५ यास दि. ०८/०३/२०२३ रोजी बाल न्यायालय मंडळ यांचे समक्ष हजर केले. यातील (टोळी प्रमुख) आरोपी साकिब मेहबुब चौधरी ऊर्फ लतिफ बागवान रा- लुनिया बिल्डिंग, चौथा मजला, कदमचाळ, कुमावत गल्ली नं. ०५. संतोषनगर, कात्रज, पुणे याने त्याचे सह अन्य सदस्यांसाठी आपले अधिपत्याखाली प्रत्येक गुन्हयात काही सामाईक व काही नविन साथीदार यांना सोबत घेवुन स्वतःची संघटीत टोळी तयार करुन गुन्हे केलेले असुन त्यांनी अवैध मार्गाने आर्थिक फायदा मिळविण्याचे उददेशाने जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, खंडणी मागणे, दुखापत करून जबरी चोरी, गंभिर दुखापत करणे, नागरीकांच्या मालमत्तेचे नुकसान करुन तोडफोड करणे, बेकायदेशिर शस्त्रे जवळ बाळगणे, पोलीसांच्या आदेशांचा भंग करणे, सर्व सामान्य नागरीकांच्या मनात दहशत निर्माण करणे, बेकायदेशिर जमाव जमविणे, या सारखे गंभिर स्वरुपाचे गुन्हे वारंवार केलेले आहेत. त्यांचेवर प्रतिबंधक कारवाई करुन देखिल सुध्दा त्यांनी पुन्हा पुन्हा गुन्हे केलेले आहेत. यातील आरोपी यांनी संघटितपणे दहशतीचे मार्गाने स्वतःचे बेकायदेशिरपणे आर्थिक फायदयाकरीता सदरचा गुन्हा केल्याचे दिसुन आलेने तसेच त्यांचे वर्तनात सुधारणा होत नसल्याने प्रस्तुत गुन्हयास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii). ३(२), ३(४) प्रमाणे चा अंर्तभाव करणेकामी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय कुंभार यांनी मा.पो. उप-आयुक्त परि-२, पुणे शहर, श्रीमती स्मार्तना पाटील यांचे मार्फतीने मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. राजेंद्र डहाळे यांना सादर केलेला होता. सदर प्रकरणाची छाननी करुन वरील आरोपी यांना भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे ११९ / २०२३.भा.द.वि. कलम ३०७, ३२३, १४३, १४४, १४७, १४८, १४९ महा. पो. अधि. कलम ३७ (१) (३) १३५ सह भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५) महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii). ३ (२), ३(४) प्रमाणेचा अंर्तभाव करण्याची मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री राजेंद्र डहाळे यांनी मान्यता दिली आहे.
सदरची उल्लेखनिय कामगीरी मा. श्री. रितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. श्री. संदिप कर्णीक, सहआयुक्त पुणे शहर, मा. श्री. राजेंद्र डहाळे साहेब, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. श्रीमती स्मार्तना पाटील, पोलीस उप आयुक्त परि २. पुणे शहर, मा. सुनिल पवार सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर, यांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय कुंभार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. विजय पुराणिक, निगराणी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड व अंमलदार स.पो.फौ. चंद्रकांत माने, पो. हवा. नरेंद्र महांगरे पोना, महेश बारवकर, पोना, विशाल वारुळे यांनी केली आहे..
मा. श्री रितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवून गंभीर गुन्हयाच्या ठिकाणी स्वतः भेट देवून कठोर व कडक कारवाई करणेबाबत वैयक्तीक मार्गदर्शन करून गुन्हयाचा सखोल तपास करून गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत…