अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो. नं.-९८२२७२४१३
सावनेर:- श्री. राधा कृष्ण देवस्थान समिती महाजन लेआऊट सावनेर येथे दोन दिवसीय गोकुळ अष्टमीच्या कार्यक्रमाचे तसेच आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
१८ ऑगस्ट ला दु.२ ते ५ वाजेपर्यंत भजनाचा कार्यक्रम होईल.सायंकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत ह. भ. प. श्री. भागवताचार्य तेजराम महाराज कांजेकर नरखेड यांचे जन्मोत्सव पर्वावर कीर्तनाचा कार्यक्रम होईल.१२ वाजता आरती करण्यात येईल.
१९ ऑगस्टला दुपारी ११ ते २ पर्यंत ह. भ. प. श्री.भागवताचार्य तेजराम महाराज कांजेकर यांचे काल्याचे कीर्तन होईल. दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत सिद्धिविनायक हॉस्पिटल तर्फे डॉ. मयूर डोंगरे (हृदय रोग व मधुमेह तज्ञ) यांच्या उपस्थितीत मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी ५.३० वा.देवाची महाआरती होईल.आरती नंतर लगेच ७ ते १० पर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रमाचे वितरण करण्यात येईल. तरी जास्तीत जास्त भक्तांनी गोकुळ अष्टमी कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. राधा कृष्ण देवस्थान समिती द्वारे करण्यात आलेले आहे.