पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
बंडगार्डन पोलीस स्टेशन, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- सागर ऊर्फ सँगी किशोर गायकवाड वय २१ वर्ष राचमन बेकरी समोर रुम नं ४१, खड्डा झोपडपट्टी, १३ ताडीवाला रोड, पुणे ( टोळी प्रमुख) व त्याचे ५ साथीदारांसोबत संघटित टोळी तयार करून त्यांनी फिर्यादी हे त्यांचे पाळीव कुत्र्यांना मारुती मंदिर चौक १३ ताडीवाला रोड, पुणे येथे फिरवत असताना. काय कुत्र्यांना घेवुन फिरतो असे बोलून शिवीगाळ केल्याने फिर्यादी यांनी त्यास तु मला का शिवीगाळ करतोस अशी विचारणा केली असता, टोळी प्रमुख व याचे साथीदार हे फिर्यादीस शिवीगाळ करून तु आम्हाला शिकवतो काय? आज तुझी गेमच करून टाकतो असे म्हणुन फिर्यादीस हाताने मारहाण करुन त्याचे बरोबर असणा-या इतर साथीदारांनी लोखंडी रॉडने फिर्यादीस जीवे ठार मारण्याचे उद्देशाने फिर्यादीच डोक्यास मारुन गंभीर दुखापत केली. त्याबाबत बंडगार्डन पोलीस स्टेशन गु.र.नं. २६/ २०२३ भा.दं.वि.क. ३०७,३२६,३२३,५०४,५०६,१४३, १४७, १४८, १४९ क्रिमीनल लॉ अमे, अॅक्ट क ३७ व महा पो अधिक. ३९(१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासा दरम्यान यातील आरोपी नामे १) प्रतिक सुनिल काकडे वय २२ रा. ताडीवाला रोड पुणे २) रोहन ऊर्फ पांड्या सुनिल काकडे वय २४ रा. ताडीवाला रोड पुणे ३) रामनाथ ऊर्फ पापा मेनीनाथ सोनवणे वय २१ रा. ताडीवाला रोड पुणे ४) शुभम जीवन वानखेडे वय २१ रा. ताडीवाला रोड पुणे यांना अटक करण्यात आली असुन टोळी प्रमुख व एक आरोपी हे गुन्हा दाखल झाले पासुन परागंदा झाले आहेत. सदर टोळी प्रमुख याने त्याचेसह अन्य सदस्यांसाठी आपले अधिपत्याखाली प्रत्येक गुन्ह्यात काही सामाईक व काही नवीन साथीदार यांना सोबत घेवुन स्वतःची संघटीत टोळी तयार करून गुन्हे केलेले असुन, त्यांनी अवैध मार्गाने आर्थिक फायदा मिळविण्याचे उद्देशाने खुनाचा प्रयत्न जबर दुखापत, दुखापत जबरी चोरी, घरफोडी चोरी, वाहन चोरी व वारंवार शस्त्राचा वापर करून लोकांमध्ये दहशत निर्माण करणे, पोलीसांच्या आदेशाचा भंग करणे या सारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे वारंवार केलेले आहेत. त्यांचेवर प्रतिबंधात्मक कारवाई करुन देखील त्यांनी पुन्हा पुन्हा गुन्हे केलेले आहेत..
यातील आरोपी यांनी संघटीतपणे दहशतीचे मार्गाने स्वतःचे आर्थीक फायया करीता सदरचा गुन्हा केल्याचे दिसुन आल्याने, तसेच त्यांचे वर्तनात सुधारणा होत नसल्याचे प्रस्तुत गुन्ह्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (11), ३(२) व ३(४) प्रमाणेचा अंतर्भाव करणेकामी बंडगार्डन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष पाटील यांनी मा. पोलीस उप-आयुक्त, परि २. पुणे शहर श्रीमती स्मार्तना पाटील यांचे मार्फतीने मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे श्री. राजेंद्र डहाळे यांना सादर केलेला होता.
सदर प्रकरणाची छाननी करुन वरील आरोपी यांना बंडगार्डन पोलीस स्टेशन गु.र.नं. २६ / २०२३ भा. दं. वि.क. ३०७,३२६,३२३, ५०४, ५०६, १४३, १४७, १४८, १४९ क्रिमीनल लॉ अमे, अॅक्ट क ३,७ व नहा, पो. अधि.क. ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (11). ३ (२) व ३(४) प्रमाणेचा अंतर्भाव करण्याची मा अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे श्री. राजेंद्र डहाळे यांनी मान्यता दिली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा. सहा पोलीस आयुक्त श्री आर.एन.राजे लष्कर विभाग, पुणे शहर है करीत आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. पोलीस आयुका पुणे शहर श्री रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे श्री. राजेंद्र डहाळे, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ २. पुणे शहर श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहा. पोलीस आयुक्त लष्कर विभाग, पुणे शहर श्री. आर. एन. राजे यांचे मार्गदर्शनाखाली बंडगार्डन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. संतोष पाटील, पोलीस निरीक्षक(गुन्हे) श्रीमती अश्विनी सातपुते तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक रविंद्र गावडे व निगराणी पथकाचे पोलीस अंमलदार यांनी केली आहे.
मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. रितेश कुमार यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली ही १७ वी कारावाई आहे.