डॅनियल अंथोनी, पिंपरी चिंचवड प्रतिनिध
अटक केलेल्यांमध्ये मयूर घोलप हा आरोपीपोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध दरोडा, खून करण्यासाठी अपहरण, खुनाचा प्रयत्न, सदोष मनुष्य वधाचा प्रयत्न, बेकायदेशीर पिस्टल बाळगणे असे गंभीर स्वरूपाचे ०७ गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी पोलीस आयुक्तांच्या हद्दीतील फरारी व तडीपार आरोपी तसेच अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.
पोलीस आयुक्तच्या आदेशानुसार शनिवार (ता. १८) रोजी खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या अधिपत्या खाली सहायक पोलीस निरीक्षक उद्धव खाडे हे स्टाफसह हिंजवडी ,मारुजी, कासरसाई भागात पेट्रोलिंग करून मावळ भागातील पुसाणे येथे आले असता सहायक पोलीस निरीक्षक खाडे यांना माहिती मिळाली की पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार मयूर घोलप हा त्याच्या साथीदारासह दुचाकीवरून पुसाने गावाकडे येत असून त्याच्याकडे पुस्तक आणि गांजा आहे.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक खाडे आणि स्टाफ पुसाणे गावातील सितमाला बंगल्यासमोरील रोडवर सापळा रुचून दुचाकीवरून आलेला आरोपी मयूर घोलप आणि श्याम भाऊ गंगावणे यांना ताब्यात घेतले त्यांचे अंगझडती घेतले असता आरोपी मयूर घोलप यांच्याकडे ४०हजार रुपये किमतीचे एक पिस्टन ६५ हजाराची एक दुचाकी आणि शंभू गंगावणे यांच्याकडे ३१ हजार किमतीचा १२४० ग्रॅम वजनाचा गांजा असा एकूण ०१ लाख ३६हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे. शिरगाव परंदवडी पोलीस ठाणे येथे दोघेविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे,मनोज कुमार लोहिया, अप्पर पोलीस डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक उद्धव खाडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक दुधावणे, अमर राऊत, पोलीस अंमलदार सुनील कानगुडे, प्रदीप गोडांबे, विजय नलगे, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, किरण काटकर, रमेश गायकवाड, निशांत काळे, रमेश मावसकर, आशिष बोटके, गणेश गिरीगोसावी, शैलेश मगर, सुधीर डोळस, प्रदीप गायकवाड, प्रदीप गट्टे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.