पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
कोथरुड पोलीस ठाणे, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- कोथरुड पोलीस ठाणे रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे सूरज उर्फ सोन्या राम कुडले, वय ३२ वर्षे, शास्त्रीनगर, कोथरुड, पुणे याने त्याचे साथीदारांसह पुणे शहर पोलीस आयुक्तालय व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील कोथरुड पोलीस ठाणे व हिंजवडी पोलीस ठाणे अशा वेगवेगळ्या पोलीस ठाणेचे कार्यक्षेत्रात घातक व जीवघेण्या हत्यारासह खूनाचा प्रयत्न, विनयभंग तोडफोड करून नुकसान करणे, दुखापत करणे, बेकायदेशीरपणे घातक शस्त्र जवळ बाळगणे समाजात दहशत निर्माण करणे यासारखे गंभीर स्वरुपायें गुन्हे केलेले आहेत, तो अत्यंत घातकी, धाडसी, खुनशी व भांडखोर वृत्तीया आहे. तो आपले जवळ नेहमी चाकु, सुरे, तलवार, गुप्ती यांसारखी घातक शस्त्रे बाळगुन असतो. कोथरुड भागात त्याची दहशत असल्यामुळे भितीपोटी नमुद गुन्हेगार सूरज उर्फ सोन्या राम कुडले, वय ३२ वर्षे शास्त्रीनगर, कोथरुड, पुणे याचेवर वेळीच ठोस प्रतिबंधक कारवाई होणे आवश्यक असल्याने तसेच त्याचे विषयीची समाजातील भिती व हिंसा कमी करुन त्याचे बेकायदेशीर कृत्यांना वेळीच पायबंद घालणे गरजेचे असल्याने त्यास कोथरुड पोलीस ठाणेचे हद्दीत वास्तव्यास राहू देणे उचित वाटल नाही, तसेच सदर इसम आधुनिक दळण-वळणाच्या साधनांच्या सहाय्याने पुणे शहरात तसेच पिंपरी-चिंचवड आयुक्तालय व पर्यायाने कोथरूड पोलीस ठाणेच्या हद्दीत येवून त्याची बेकायदेशीर कृत्ये करून तात्काळ निघुन जाण्याची शक्यता असल्याने जनहितासाठी त्यास पुणे शहर, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे जिल्ह्यातून तडीपार करणे संयुक्तिक असल्याने महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ कलम ५६(१)(अ) (१) मधील तरतुदींनुसार नमुद गुन्हेगार सूरज उर्फ सोन्या राम कुडले यास पुणे शहर, पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे जिल्हा कार्यक्षेत्र व पुणे जिल्ह्यालगतच्या जिल्ह्यांच्या कार्यक्षेत्रातुन तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव योग्य मार्फतीने वरिष्ठ कार्यालयास सादर केला होता. सदर प्रस्ताव वरिष्ठांनी मान्य करुन मा. श्री. सुहेल शर्मा, पोलीस उप आयुक्त परिमंडळ- ३. पुणे शहर यांनी नमुद गुन्हेगारास ०१ (एक) वर्ष एवढ्या कालावधीकरीता पुणे शहर, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे जिल्हा कार्यक्षेत्रातून हद्दपार केल्याचे आदेश पारीत केले आहेत.
सदर प्रकरणी मा. श्री. सुहेल शर्मा, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३. श्रीमती रुक्मिणी गलंडे, सहायक पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक, गुन्हे, श्री. बाळासाहेब बड़े, पोलीस उपनिरीक्षक बसवराज माळी, पोलीस अमलदार धाबेकर, खाडे व अनिल बारड यांनी उत्तम कामगिरी केलेली आहे.
मा. श्री रितेश कुमार, पोलीस जायुक्त, पुणे शहर यांनी पुणे आयुक्तालयाचा कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन समाजात दहशत निर्माण करणा-या च सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यानुसार त्यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे भविष्यात देखील सराईत व अट्टल गुन्हेगारांचे गैरकृत्यांना आळा घालण्यासाठी अशाचप्रकारे प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे.