प्रशांत जगताप, मुख्यसंपादक 7385445348
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वाशिम:- आज वाशिम शहरातील अनेक रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. परिणामी, रस्त्याची खड्डे पडल्याने खड्ड्यांमधील माती, खडी रस्त्यावर आल्याने सर्वत्र परिसरात धूळ पसरल्याने या ठिकाणाहून ये-जा करताना वाहनधारकांना अपघाताचा धोका वाढला आहे. विशेष म्हणजे, अनेक वर्षांपासून हीच परिस्थिती असूनही स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधी रस्ते कामाकडे दुर्लक्ष करीत आहे.
वाशिम शहरातील हे रस्ते शहरातील नागरिकाचे जीव घेणे ठरत आहे. अनेक वेळा प्रशासनाला निवेदन माहिती देऊन ही स्थानिक प्रशासन कुंभकर्णी झोपेत आहे. निवेदन देऊन दखल घेण्यात येत नाही. अशा मगळुळ प्रशासनाला जागे करण्यासाठी वाशिम जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दल व महाविकास आघाडीच्या वतीने दि. 21 मार्च मंगळवार ला शहरातील पुसद नाका येथे रास्ता-रोको आंदोलन करण्यात आले.
वाशिम शहरातील अनेक भागातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. हे शहरातील नागरिकानसाठी जीवघेणे ठरू लागले आहे. लोक प्रतिनिधी व स्थानिक प्रशासनाने नागरिकांच्या मूलभूत अधिकार आणि शहरातील प्रश्न सोडविण्याचे निर्णय करणे अपेक्षीत आहे. परंतू, लोकप्रतिनिधी व स्थानिक प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्यामुळे स्थानिक नागरिकांना रस्त्यावरील जिवघेण्या खड्ड्यातून मार्ग काढावा लागत आहे. या मुळे शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँगेस सेवा दल व महाविकास आघाडीचा वतीने पुसद नाका येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अमरावती जिल्हा निरीक्षक सोनाली ठाकूर, सुनील पाटील, प्रमोद राजगुरू माजी शिवसेनाप्रमुख सुरेश मापारी, महादेव कोडके, पुष्पकुमार राठोड, रामदास मत्ते, सुरेश मातारे, बालाजी वानखेडे, राजू गंगवाल, पुरुषोत्तम ढोपे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.
यावेळी महाराष्ट्र संदेश न्युज बरोबर बोलताना राष्ट्रवादी महिला काँगेस अमरावती जिल्हा निरीक्षक सोनाली ठाकूर म्हणाल्या की, आज शहरात विविध प्रश्न निर्माण झाले आहे, खराब रस्ते, विज, पाणी, रोजगार याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत आहे. अशा लोकांना जागे करण्यासाठी आम्ही हे रस्ता रोको आंदोलन केलं. यानंतर पण प्रशासन जागे नाही झाले तर पुढे यापेक्षा मोठे आंदोलन करण्यात येईल याची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348